जाणून घ्या मध आणि दालचिनीच्या मिश्रणाचं सेवन केल्यानं होणारे ‘हे’ महत्त्वाचे फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मध आणि दालचिनी हे असे पदार्थ आहेत जे खूप औषधी आहेत आणि घरात सहज उपलब्ध होतात. दोन्हीही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. मध आणि दालचिनी यांचं जर एकत्र सेवन केलं तर आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आज आपण या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतलं तर जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.

2) अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि मध मिसळून गरम पाण्यातून पिल्यास आर्थरायटीसच्या दुखण्यापासून आराम मिळतो. हे मिश्रण दुखत असलेल्या जागेवरही लावू शकता.

3) तीन चमचे दालचिनी पावडरमध्ये 2 चमचे मध मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्या. याचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाण 10 टक्के कमी होऊ शकतं.

4) चीनमध्ये महिला आपल्या गर्भाशयाला मजबूत करण्याासाठी दालचिनी पावडर खातात. अनेक अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, दालचिनी पावडरचं नियमित सेवन केल्यास पॉलिसिस्टीक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS) मध्ये वाढ होते.

5) दिवसातून 3 वेळा गरम पाण्यासोबत मध आणि दालचिनी पिल्यास वजन कमी होतं. सकाळी नाश्ता झाल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मे मिश्रण घ्यावं. या मिश्रणामुळं फॅट कमी होतं.

6) ज्यांना स्कीन इंफेक्शन असेल त्यांच्या साठी मध आणि दालचिनीचं सेवन वरदान आहे. मध आण दालचिनी सेवनामुळं किटाणू मरतात.

दालचिनीचे फायदे –
1) दालचिनीमुळं मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात.

2) थंडीमुळं डोकं दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.

3) दालचिनी, मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर सेवन केलं तर पोट फुगत नाही.

4) मुरूमे आले असतील तर जाण्यासाठी दालचिनीचं चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावं. यामुळं फायदा मिळतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.