Honey-Lemon Water Reduce Belly Fat | सकाळी गरम पाण्यात लिंबू व मध घालून पिल्याने वजन घटते?; जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन – Honey-Lemon Water Reduce Belly Fat | अनेकजण वजन कमी करण्यासाठी अनेक पर्यायाचा वापर करत असतात. अनेकजण अनेक आहाराकडे देखील अतिशय कटाक्षाने लक्ष देत असतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी एक सोपी  पद्धत आहे. सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिणे (Drink Lemon And Honey In Hot Water). सकाळी उपाशी पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होते. शिवाय बेली फॅट (Belly Fat) कमी होण्यास देखील मदत होणार आहे. याबाबत तुम्हीही प्रक्रिया (Weight Loss Measures) करु शकता. याबाबत जाणून घ्या (Honey-Lemon Water Reduce Belly Fat)

 

गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास त्याचा सरळ फायदा वजन कमी होण्यावर होत नाही. पण, काही अभ्यासामधून असे लक्षात आले आहे की, लिंबू पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. (Honey-Lemon Water Reduce Belly Fat)

 

लिंबाच्या रसामध्ये असणारे पॉलीफेनोल्स आणि लिंबाची साल यकृताच्या (Liver) फॅट बर्न करण्याच्या प्रोसेसला प्रोत्साहित करतात. ज्यावेळी उंदरांवर हा अभ्यास करण्यात आला, तेव्हा त्यांना अधिक फॅटयुक्त अन्न खाण्यास दिलं होतं. त्यामुळे माणसांवर याचा परिणाम कसा होतो याबाबत शाश्वती नाही. असं जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री अँड न्यूट्रिशन (Journal Of Clinical Biochemistry and Nutrition) या जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे.

 

पेक्टिन फायबर (Pectin Fiber) –

लिंबात पेक्टिन नावाचे फायबर असते. जे भूक आणि कॅलरीची मात्रा कमी करण्यासाठी फायदेशीर असते, लिंबाच्या रसात एक ग्रामपेक्षाही कमी प्रमाणान पेक्टिन हे फायबर असते. त्यामुळे शरीराला हे फायबर कमी प्रमाणात मिळत असल्याने भूक कमी लागण्याच्या आणि कॅलरीज कमी मिळण्याच्याबाबत जादा फायदा मिळत नाही. त्याचबरोबर साध्या व सोप्या शब्दामध्ये लिंबू पाणी हे डिटाॅक्स ड्रिंक (Detox Drink) असल्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या वजनावर होत नाहीये.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Honey-Lemon Water Reduce Belly Fat | honey lemon water can really helps you to reduce belly fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा