6 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींची रखडलेली कामे होतील पूर्ण, मिळेल भाग्याची पूर्ण साथ; इतरांसाठी असा आहे रविवार

मेष : horoscope
horoscope लाभाचा दिवस आहे. (horoscope)
कुठेही गुंतवणुक करण्यासाठी चांगला दिवस, भरपूर लाभ होईल.
आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यस्त रहाल.
विनाकारण धावपळ होईल, सावध रहा, पायाला दुखापत होऊ शकते.
सायंकाळी मंगलकार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न होईल.

वृषभ
दिवस पैशाच्या बाबतीत कमजोर आहे.
अनावश्यक खर्च टाळा. एखादा शारीरीक त्रास होऊ शकतो.
सायंकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबात मजामस्ती कराल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
सामाजिक कार्यक्रमात सुद्धा भाग घेऊ शकता. आवड धर्म आणि आध्यात्मिक क्षेत्रात वाढेल.

मिथुन
भाग्याची भरपूर साथ मिळेल. जी मेहनत केली होती तिचे गोड फळ मिळेल.
आजोळातून प्रेम मिळेल.
विलासी सुविधांवर खर्च कराल. खर्चाच्या बाबतीत आजचा दिवस लाभदायक आहे.
शत्रुसुद्धा तुम्हाला पाहून अस्वस्थ होतील. आई-वडीलांची विशेष काळजी घ्या, त्यांच्या आशीर्वादाने मन प्रसन्न राहील.
संततीवरील विश्वास वाढेल.

कर्क
दिवस संमिश्र आहे. सासरच्या बाजूकडून लाभ मिळेल.
जुने वाद दूर होतील, परंतु वाणी मधुर ठेवा, कामे सहज होतील.
डोळ्यांसबंधी आजार बरे होतील.
मानसिक अशांती आणि चिंता यामुळे चिडचिड राहील.
आई-वडीलांच्या आशीर्वादाने दिलासा मिळेल.

सिंह
दिवस लाभदायक आहे. धाडस आणि निर्भिडता राहील.
पत्नीला आरोग्याची समस्या होऊ शकते.
कुणाला मदत केली तरी लोक तुमचा स्वार्थ समजतील.
व्यापारात भरपूर धनलाभ होईल.
आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. समाधानी राहाल.

कन्या
इतरांबाबत जास्त विचार करता, चिंता करता, यामुळे अनेकदा तुमची कामे राहून जातात.
गुरूबाबत भक्तीभाव आणि निष्ठा ठेवाल.
व्यवसायात गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे.
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतल्यास त्यामध्ये यश मिळेल.
सायंकाळ कुटुंबासोबत घालवाल.

तुळ
काही कारणामुळे मनात अशांती आणि अस्वस्थता राहील.
व्यापारात वाढीचा प्रयत्न निष्फळ होईल.
सायंकाळी धैर्याने शत्रुंवर विजय मिळवाल.
सरकारी वाद निकाली निघेल. दिवसाची अखेर सुखदायक असेल.
कुटुंबियांची साथ मिळेल. संततीकडून सुखद बातमी समजेल.

वृश्चिक
आज तुमच्यात दानधर्म, परोपकाराची भावना विकसित होईल.
धार्मिक कार्यात सुद्धा रुची दाखवाल.
ज्यामध्ये भाग्याची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुदृढ राहील.
सायंकाळपासून रात्रीपर्यंत काही कारणामुळे पोटदुखीची समस्या होऊ शकते, खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.
मित्रांसोबत फिरायला जाल.

धनु
मौल्यवान वस्तूंची प्राप्ती होईल.
अनावश्यक खर्च होईल, जे इच्छा नसतानाही समोर येतील.
सासरच्या बाजूने मान सन्मान मिळेल. लाभ होईल.
रखडलेली कामे पूर्ण होतील.
एखाद्या कामात गुंतवणुक केल्यास भविष्यात लाभ प्राप्त होईल.

मकर
कुटुंबियांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
सायंकाळपासून रात्रीपर्यंत प्रवास कराल, जो लाभदायक असेल.
बुद्धी आणि विवेकाने नवीन शोध घ्याल. आवश्यकतेनुसार खर्च करा.
कुटुंबातील सदस्य साथ देतील. पत्नीशी वाद होऊ शकतो.

कुंभ
संततीसंबंधी वाद, समस्या सुटेल. कुटुंबात आनंद राहील.
मित्र वाढतील. मान सन्मान मिळाल्याने मनोबल आणखी वाढेल.
रात्री कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल.
दिवस उत्तम लाभदायक आहे.

मीन
आज सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत मजामस्ती कराल.
पत्नीकडून प्रत्येक प्रकारचे सहकार्य मिळेल.
सन्मान प्राप्तीचा दिवस आहे.
व्यक्ती किंवा बँकेकडून कर्ज घेऊ नका, परतफेड करू शकणार नाही.
जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील.
विद्यार्थ्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल.

Also Read This : 

 

‘धतूरा’ पुरूषांसाठी वरदान ! टक्कलेपण दूर करण्यासह वाढवतो शारीरिक ‘Power’, ‘या’ पध्दतीनं वापरा, जाणून घ्या

 

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’