पिढीजात घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांची दिवाळी अंधारात 

सातारा: पोलीसनामा ऑनलाईन  – महाराष्ट्रातील पर्यटकांना खुणावणाऱ्या महाबळेश्वर,पाचगणीत आता घोड्यावर बसून सैर करता येणार नाही, की सेल्फी घेता येणार नाही. याचे कारणंही तसेच आहे. कारण  या ठिकाणच्या घोड्यांवर पोलिसांनी बंदी आणली आहे. त्यामुळे पिढीजात घड्यांचा व्यवसाय करणाऱ्या स्थनिक लोकांची यंदाची दिवाळी मात्र अंधारमय  होणार आहे.
या घटनेमुळे पोलिस प्रशासनाने बंदी आणल्याने घोड्यांच्यी टाप थांबल्यामुळे पाचगणीच्या टेबल लँडवर आणि महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात हा सन्नाटा पहायला मिळत आहे. सेल्फी आणि डोळ्याला दिसेल तेवढेच पाहून या ठिकाणाहून पर्यटक परतीच्या मर्गावर जाताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी याच टेबल लँडवर घोडे सवारी कराताना पर्यटकाचा पडून मृत्यू झाला होता. यामुळे पोलिस प्रशानसाने घोड्यांवर बंदी आणली आहे.
पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदामुळे आता स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. पोलिस प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. एखाद्या घटनेमुळे पोलिसांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे, असे महाबळेश्वरचे नगराध्यक्ष कुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
घोडा उधळून एकाचा मृत्यू –
मुंबईतील शिवडीमध्ये राहणारे हे नवदाम्पत्य हनिमून साजरा करण्यासाठी पाचगणीला गेले होते. टेबल लँडचे सौदर्य निखरताना घोड्यावरुन फेरफटका मारण्याची इच्छा पतीची झाली. पण अचानक घोडा उधळला आणि त्यात घोड्यावरुन खाली पडून पती जखमी झाला व त्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना २५ ऑक्टोबर रोजी  घडली. महमंद नसीब करम खान (वय ३५, रा. शिवडी वेस्ट, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 पाचगणीच्या टेबल लँडवर हे नवदाम्पत्य बुधवारी सायंकाळी फिरायला गेले होते. टेबल लँडवरच्या मोठ्या मैदानात पर्यटकांना घोडसवारी घडवून आणण्यासाठी अनेक घोडे तेथे होते. फिरुन आल्यानंतर महमंद खान हे एका घोड्यावर बसले. त्यांना घोडे सवारी करताना मालकाच्या हातातून घोडा सुटला व तो वेगाने पळून लागला. समोरुन आलेल्या घोड्यांना बघून घोडा उधळला. यामुळे महमंद खान हे घोड्यावरुन खाली पडले व घोडा त्यांच्या अंगावर कोसळला. त्यांच्या नाका तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यांना तातडीने पाचगणी येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने नंतर त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनाला जात असतात. शहरात घोड्यावर बसायला मिळत नसल्याने कधीही घोड्यांवर न बसलेले हजारो पर्यटक आपल्या छोट्या मुलांसह घोड्यावरुन फिरण्याचा आनंद घेत असतात. पण आपण ज्या घोड्यावर बसतो आहोत, तो घोडा कसा आहे, याची त्यांना काहीही माहिती नसते. गर्दी अथवा इतर घोड्यांच्या हरकतीमुळे तो घोडा उधळून किरकोळ अपघात नेहमीच घडत असतात. पाचगणीतील टेबल लँडवर घडलेला हा प्रकार पाहता पर्यटनस्थळी अशा घोड्यांवर बसताना काळजी घेणे  आवश्यक ठरू लागले आहे.