पुणे : मित्रासाठी सोडले घर… मात्र घरच्या आठवणीने आले परत

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

मैत्री जपण्यासाठी अनेकजणे वाट्टेल ते करतात. मात्र पुण्यामध्ये एका शाळेत शिकणा-या दोन मित्रांनी मित्राला घरच्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या कारणावरुन शाळेतूनच पळ काढला. मात्र घरच्या आठवणीमुळे दोन मित्र परत आले पण एकजण घरी परतलाच नाही. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असून त्याला आणण्यासाठी पोलीस गेले आहेत.

शिवाजीनगर येथील एका नामांकीत शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेत शिकणा-या आकाश पवार, श्रीनाथ डोंगरे हे दोघजण मंगळवारी (दि.२४) शाळातून निघून गेले. आकाश पवार, श्रीनाथ डोंगरे यांचा मित्र संतोष झडपे याला घरातील मंडळी शाळेत जाण्यावरुन त्रास देत होते. या त्रासाला वैतागून या तिघांनी शाळा सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी आकाश आणि श्रीनाथ शाळेत आले. मात्र संतोष झडपे हा शाळेत आला नाही. आकाश आणि श्रीनाथ या दोघांनी शाळेचा पहिला तास करुन शाळेतून पळून गेले.
[amazon_link asins=’B00W6ZUMW8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e6008ee7-90d5-11e8-b82b-b9adcfb4808f’]
या तिघांनी पुण्यातून थेट कर्नाटक गाठले. कर्नाटकामध्ये झडपे याची आजी राहते. आजीकडे जाऊन ते राहीले मात्र आकाश आणि श्रीनाथ यांनी घरच्यांची आठवण येऊ लागली. दरम्यान, आकाशच्या घरच्यांनी मुलगा शाळेतून घरी परतला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र आकाश सापडला नाही. अखेर आकाशचे वडील संभाजी शिवाजी पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. पोलीस तपास करत असताना आकाश आणि श्रीनाथ हे दोघे बुधवारी रात्री तीनच्या सुमारास घरी परतले. मात्र श्रीनाथ आला नाही. घरच्यांकडून शाळेत जाण्यावरुन त्रास दिला जात असल्यामुळे तो घरी परतला नाही. पोलीस श्रीनाथला परत आणण्यासाठी कर्नाटकात जात असल्याचे तपासी अधीकारी यांनी सांगितले.