गुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोने, चांदीसह रोख रक्कम लंपास केली आहे. तर गुळूंचेतील आणखी एका घराचा दरवाजा चोरट्यांंनी उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याने गुळूंचे गावात व परिसरातील लोकांमध्ये भिती
निर्माण झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गुळुंचे (ता.पुरंदर) येथील सरपंच संभाजी कुंभार यांच्या घराचा दरवाजा मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोडून घरफोडी केली. या घरफोडीत सुमारे १७ तोळे सोने, २५ हजार रुपयांच्या आसपास चांदी व ४० हजार रुपयांच्या आसपास रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केेेल्याचे सरपंच संभाजी कुंभार यांनी सांगितले. तसेच गुळूंचे येथील माळवस्तीतील एका घराचे दार कटावणीने तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

दरम्यान, जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस कर्मचाऱ्यांना तपासकामी मार्गदर्शन केले. गुळूंचेचे माजी सरपंच गणेश पोपट कर्नवर यांच्या घरावर तीन वर्षांपुर्वी ७ सप्टेंबर २०१६ रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यात गणेश कर्नवर यांचे वडील पोपट कर्नवर व आजी पार्वती कर्नवर यांना मारहाण झाल्याने त्यांना जीव गमवावा लागला. तसेच मंगळवारी मध्यरात्री गुळूंचेच्या सरपंंचाचे घर फोडून चोरी केल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. गुळूंचेचे नागरिक हादरले आहेत. त्यामुळे या घरफोडीचा तातडीने तपास लागणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like