Ration Card : जाणून घ्या रेशन कार्ड बनवण्याची ऑफलाइन आणि Online पद्धत, काही राज्यांनी बदलले नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मागील सहा महिन्यांपासून मोदी सरकारच्या मोफत धान्य योजनेची मोठी चर्चा झाली. कोरोना काळात 81 कोटीपेक्षा जास्त रेशन कार्डधारकांना भारत सरकारने या योजनेतून धान्य पोहचवले. लॉकडाऊन दरम्यान सुद्धा लोकांनी उपाशी राहू नये यासाठी मोदी सरकार मार्च महिन्यापासून रेशनकार्ड धारकांना 5 किलो धान्य (गहू, तांदूळ आणि डाळ) मोफत देत आहे. सरकारची ही योजना नोव्हेंबरपर्यंत जारी राहणार आहे.

सरकारच्या या योजनेत रेशन कार्डची भूमिका मोठी आहे. रेशन कार्ड भारत सरकारचे एक मान्यताप्राप्त सरकारी डॉक्यूमेंट आहे. रेशन कार्डच्या सहायाने लोक सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानातून धान्य खरेदी करू शकतात. या योजनेचा कुणाला लाभ मिळतो आणि रेशनकार्ड कसे बनवावे, हे जाणून घेवूयात.

रेशन कार्ड का आहे जरूरी
देशात वन नेशन वन कार्डची व्यवस्था लागू झाल्यानंतर लोकांसाठी रेशन कार्ड असणे खुपच आवश्यक झाले आहे. याचा वापर केवळ स्वस्त रेशन घेण्यासाठी होत नाही तर ओळखपत्र म्हणून सुद्धा ते उपयोगी पडते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्याचा व्यक्ती संपूर्ण देशात कुठेही स्वस्त रेशन घेऊ शकतो. 3 प्रकारचे रेशन कार्ड असते, गरीबी रेषेच्या वर (एपीएल), गरीबी रेषेच्या खाली (बीपीएल), अंत्योदय कुटुंबांसाठी.

कोण बनवू शकते रेशनकार्ड
रेशन कार्ड बनवण्यासाठी व्यक्ती भारताची नागरिक असेण अनिवार्य. व्यक्तीकडे अन्य राज्याचे रेशन कार्ड नसावे. ज्याच्या नावावर रेशनकार्ड बनत आहे त्याचे वय 18 पेक्षा जास्त असावे. अठरा वर्षांच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांची नावे आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये असतात. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावर रेशनकार्ड असते. रेशन कार्डमध्ये ज्या सदस्यांना सहभागी करून घेतले जात आहे, त्यांचे कुटुंब प्र्रमुखाशी जवळचे नाते असणे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे तत्पूर्वी कोणत्याही रेशनकार्डात नाव असू नये.

कुठे आणि कसे बनवू शकता रेशन कार्ड
रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा. यानंतर अ‍ॅपलाय ऑनलाइन फॉर रेशन कार्ड च्या लिंकवर क्लिक करा. रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येते. रेशन कार्डसाठी अर्जाचे शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अ‍ॅपलिकेशन बसमिट करा. फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य असेल तर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.

ही कागदपत्रे आहेत आवश्यक
आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, सरकारी आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देता येईल. याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला पत्त्याचा पुरावा म्हणून विज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, रेंटल अ‍ॅग्रीमेंट सारखे डॉक्युमेंट सुद्धा लागतील.

काही राज्यांनी बदलली पद्धत
प्रत्येक राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीने रेशन कार्ड बनवते. काही राज्य हे बनवण्यासाठी शुल्क आकारतात तर काही फ्री मध्ये बनवतात. वेगवेगळ्या रेशन कार्डसाठी फीस वेगवेगळी अतसे. दिल्लीत रेशन कार्ड बनवताना 5 रुपये ते 45 रुपये फी द्यावी लागते. रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्व प्रकारच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेनंतर सुमारे 30 दिवस लागतात.