परदेशात बाप्पांचं असं स्वागत होतं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून आपल्याकडे बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात केले जाते. ज्या पद्धतीने आपल्याकडे बाप्पाचे स्वागत केले जाते. त्याच पद्धतीने परदेशात देखील बाप्पाचे स्वागत केले जाते. कामानिमीत्त परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरु झाली आहे. परदेशातील भारतीयांना गणपतीची स्थापना करता यावी. यासाठी भारतातून खास गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. मागील काही वर्षात परदेशात गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे.

मॉरिशस
मॉरिशसमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी हिंदूंचे सर्व सण उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या ठिकाणी १९८६ पासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मॉरिशस मध्ये असलेल्या भिवजाई कुटुंबाईने गणेशोत्सवाची सुरुवात सर्वप्रथम केली. यानंतर देशभरात याची चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी स्थायिक झालेले भारतीय नागरिक गणपतीची स्थापना करु लागले. विशेष म्हणजे मॉरिशस सरकारने गणेश चतुर्थीला भारतीयांना गणपतीची स्थापना करता यावी यासाठी सुट्टी जाहीर केली आहे. या ठिकाणी काढण्यात येणाऱ्या गणपतीच्या मिरवणुकीत या ठिकाणचे सर्वधर्मीय धर्माचे लोक सहभाग घेतात.

इंग्लंड
इंग्लंड आणि युरोपिय देशात अनेक भारतीय स्थलांतरीत झाले आहेत. या देशात सर्वप्रथम २०१५ मध्ये विश्व हिंदू मंदिरात पहिल्यांदा गणपतीची स्थापना करण्यात आली. इंग्लंडमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लंडनमधील मंदिरे, गुरुद्वारा आणि विविध हिंदू संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी गणेश उत्सव उत्साही वातावरणात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला गणपतीपुढे ढोल ताशा बरोबरच टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले जाते. यामध्ये स्थानिक ख्रिश्चन लोक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मोदकाचा आस्वाद घेत असतात. बाप्पाचे आगमन होताच या ठिकाणचे वातावरण बाप्पामय होऊन जाते. या ठिकाणी गणपतीचे विसर्जन थेम्स नदीत केले जाते.

फ्रान्स
फ्रान्समधील श्री मणिक्का विनायक मंदीरात गणेशोत्सव साजरा केला जातो. फ्रान्समध्ये गणेश चतुर्थी दिवशी गणपतीचे स्वागत धुमधडाक्या केले जाते. दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने पूजा-आर्चा करण्यात येते. ज्या रस्त्यावरून बाप्पाची मिरवणूक निघते. तो रस्ता पाण्याने धुतला जातो. अनंत चतुर्थीला हिंदूबरोबरच, श्रीलंकन व युरोपियन नागरिक बापाला निरोप देण्यासाठी एकत्र येऊन भक्की भावाने निरोप देतात.

अमेरिका
अमेरीकेतील साई संस्थान व विविध हिंदू संघटनांकडून गणतीची स्थापना केली जाते. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. स्थानिक लोक गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लेझीम, ढोल ताशा वाजवत बाप्पाचे स्वागत करतात. येथील न्यूयॉर्क, मियामी, सॅन फ्रान्सिस्को, फ्लोरिडा याचबरोबर इतर भागातील हिंदू आणि स्थानिक लोक गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. या ठिकाणी दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सर्वधर्मीय लोक सहभागी होतात.

जपान
जपानमध्ये गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या ठिकाणी गणपतीला कनिगतन असे संबोधले जाते. बाप्पाचा संबंध जपानमधील बौद्ध संस्कृतीशी असल्याची दंत कथा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. या दंतकथेनुसार ८ आणि ९ व्या शतकात गणपती भारतातून फिरून चीनमध्ये आले. तेथून ते जपानमध्ये आले. जपानमध्ये आल्यानंतर त्यांनी बराच काळ या ठिकाणी वास्तव्य केले. जपानमध्ये कनिगेत म्हणजेच गणपतीची पूजा व्यावसायिक आणि कलाकार मंडळी करतात.

आरोग्यविषयक वृत्त –