पाठदुखीनं त्रस्त आहात ? आजच बदला ‘या’ महत्त्वाच्या दैनंदिन सवयी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्ही पाठदुखी आणि कंबरदुखीनं त्रस्त असाल तर तुमच्या रोजच्या जीवनातील काही सवयीत तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. या सवयी कोणत्या आहेत याची आज आपण माहिती घेणार आहोत.

1) मुलायम/सॉफ्ट गादीवर झोपणं – मुऊ मुलायम गादीवर झोपल्यानं स्पाईन पोजिशन खराब होऊ शकते. त्यामुळं पाठदुखी आणखी वाढू शकते.

2) झोपण्याच्या पद्धती – ट्रेनमध्ये मान तिरकी करून झोपणं, जेवणानंतर लगेच कोणत्याही स्थितीत झोपणं, मोठ्या उशा घेऊन वाचत बसणं किंवा झोपणं, मान मोडत बसणं, सतत मान हलवत राहणं, या कारणांनीच या व्याधी बळावतात. त्यामुळं झोपताना आपल्या शरीराच्या अवयवाचं भान ठेवून झोपणं गरजेचं आहे.

3) चुकीच्या पद्धतीनं बसणं – चुकीच्या पद्धतीनं बसणं हे पाठदुखीचं कारण असू शकतं. अनेकदा आपल्याला बसण्याचं भान रहात नाही. अशावेळी खूप वेळ बसून राहिल्यानं देखील कंबर दुखायला लागते. त्यामुळं बसताना थोडी काळजी घ्यायला हवी.

4) एकाच पोजीशनमध्ये बसणं किंवा ऑफिसची बैठक – जर तुम्ही तासन तास एकाच पोजिशनमध्ये बसत असाल तर तुम्हाला पाठदुखी किंवा कंबरदुखी अशा समस्या येतात. भारतात एकही ऑफिस असं नाही जिथं शरीररचनेचा अभ्यास करून किंवा कामाच्या स्वरूपावरून टेबल-खुर्चीची उंची आखली आहे.

5) वजन उचलणं – कधी कधी आपण आवाक्या बाहेरचं वजन उचलण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी कंबरदुखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

6) चुकीचा व्यायाम – अनेकजण व्यायामशाळेत चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करतात. अशा लोकांना पाठदुखी, कंबरदुखी अशा समस्या येतात. व्यायाम करणं शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करणं तुमची डोकेदुखी वाढवू शकतं.

7) दुचाकी वाहनं – रस्त्यावरील गतिरोध, रस्त्यातील खड्डे, दुचाकी वाहनांवर जास्त फिरणं या कारणांनी मणक्यांवर अधिक ताण पडून पाठीला इजा पोहोचते. म्हणून दुचाकीमुळं पाठीचा त्रास बळावू शकतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.