How To Get Rid Of Fatigue Fast | थोडे काम करताच थकून जाता का? इन्स्टंट एनर्जीसाठी ट्राय करा ‘हे’ 5 देशी फूड, कमजोरी आणि आळस होईल गायब

How To Get Rid Of Fatigue Fast

नवी दिल्ली : How To Get Rid Of Fatigue Fast | थकवा आणि अशक्तपणाची अनेक कारणे आहेत, परंतु सामान्यतः जेव्हा व्यक्ती खूप काम करते तेव्हा थकते. पण काही लोक असे ज्यांना थोडे काम केले तरी थकवा येतो. अशक्तपणाही येऊ लागतो. कोणताही गंभीर आजार नसेल तर प्रामुख्याने व्हिटॅमिन आणि मिनरलची कमतरता यास कारणीभूत असते (How To Get Rid Of Fatigue Fast).

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, जेव्हा शरीरात आयर्न, व्हिटॅमिन बी२, बी५, बी६, बी९, बी१२, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियमसारख्या पोषक तत्वांची कमतरता असते, तेव्हा थकवा आणि अशक्तपणा वाढतो. असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने थकवा आणि अशक्तपणा लवकर दूर करू शकतो ते जाणून घेऊया. (How To Get Rid Of Fatigue Fast)

थकवा दूर करणारी फळे

१. चेरी

चेरी हे झटपट ऊर्जा देणारे फळ आहे. चेरी ऐवजी तुम्ही स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, जांभुळ इत्यादी फळे देखील खाऊ शकता.

२. केळी

केळी हे अत्यंत पौष्टिक फळ आहे. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे मज्जासंस्था म्हणजेच नसा कमकुवत होऊ लागतात. नसा कमकुवत झाल्यामुळे स्नायूंमध्ये वेदना सुरू होतात आणि थकवा आणि अशक्तपणा येतो. यातील व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेटमुळे त्वरित ऊर्जा मिळते.

३. बदाम

बदाम खाल्ल्याने शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता दूर होते. व्हिटॅमिन्स, झिंक, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स सारखे अनेक प्रकार बदामामध्ये आढळतात.

४. चिया सीड्स

चिया सीड्समध्ये पुरेशा प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते. इटलीतील सिएना विद्यापीठातील संशोधकांनी दावा केला आहे की, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे सतर्कता वाढून थकवा लगेच दूर होतो.

५. ओट्स

ओट्स हा प्रोटीनचा खजिना आहे. ओट्समध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन असतात. हे ब्लड शुगरचे प्रमाण देखील कमी करते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)