Home Remedies : पोटदुखीची समस्या आहे, ताबडतोब करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, जाणून घ्या

पोटदुखीची अनेक कारणे असतात. यामध्ये चुकीचे खाणे, वेळेत न खाणे, व्यवस्थित न खाणे, खराब जीवनशैली अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. एखाद्या आजाराने ग्रस्त असल्यासही पोटदुखी होऊ शकते. पोटदुखीवरील घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत. हे उपाय केल्याने पोटदुखीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. जर इतर कोणता आजार असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे उपाय करा

1 आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा. त्याचा रस हळू हळू चोखत रहा. पोटदुखीमध्ये आराम मिळेल.

2 पोटाच्या दुखण्यापासून मुक्त होण्याचा मुळा हा एक चांगला मार्ग आहे. मुळ्याच्या रसात थोडी मिरपूड आणि मीठ घाला. हा रस सेवन करा. पोट स्वच्छ होईल तसेच पोटदुखीची समस्याही दूर होईल.

3 असे म्हणतात की पोटदुखीत हिंग खूप फायदेशीर असतो. हिंगाची गोळी किंवा हिंग थोडा गरम करून बेंबीवर ठेवा. आराम मिळेल.

4 पोटदुखीत जिरे आणि पाणी खूप चांगले आहे. पोटदुखीमध्ये कोमट पाण्याबरोबर जिरे घ्या. तुम्हाला आराम मिळेल.

5 असे म्हणतात की बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट योग्यप्रकारे साफ न झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो. अशावेळी, इसबगोल कोमट पाण्यासोबत घ्या. त्वरित आराम मिळेल.