ताज्या बातम्यामनोरंजन

Hruta Durgule | ‘फक्त 8 दिवस बाकी’ असं म्हणत ऋता दुर्गुळेनं शेअर केला प्रियकरासोबत फोटो, चाहत्यांमध्ये रंगल्या तुफान चर्चा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Hruta Durgule | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळेनं (Hruta Durgule) स्वतःच्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर निर्माण केला आहे. हृता ‘फुलपाखरू’ (Fulpakharu) या मराठी मालिकेमधून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली. हृता आता काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे.

ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) प्रोफेशनल आयुष्याबद्दल बरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाह(Pratik Shah ) सोबत तिनं एक फोटो शेअर करत, आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे आता सध्या हृता तिच्या रिलेशनशिपमुळे (Hruta Durgule Relationship) चर्चेत आली आहे. हे दोघं रिलेशनमध्ये असून, ती सतत त्यांचे एकत्र असलेले फोटो शेअर करत असते.

 

 

ऋता दुर्गुळेनं नुकतंच सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिच्यासोबत बॉयफ्रेंड प्रतीक आहे. तरी या फोटोच्या कॅप्शनखाली तिनें लिहिलं की, “मी इतकी भाग्यवान कशी काय? प्रतीक तुझे धन्यवाद. तुझे कधीही न संपणारे विनोद, बडबड, आनंद देणारी मैत्री आणि आयुष्यभरासाठीच हे प्रेम… हे आज, आत्ता आणि पुढे देखील कायम असेल.” तिचं हे कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

या फोटोला तिनं #8daystogo #happiness #grateful #positivevibesonly #blessedandhow हे हॅशटॅग वापरले आहेत. त्यामुळे आठ दिवसांमध्ये नक्की काय याबद्दल चाहते चांगलेच आतूर झाले आहेत. 8 दिवसात नक्की काय आहे? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.तिच्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी 8 दिवस नेमकं कशासाठी? असा प्रश्‍न विचारला आहे. तर एका युजरने कमेंटमध्ये, “8 दिवसांनी तुम्ही लग्न करणार आहात का? हे प्रश्न विचारला आहे. तर दुसरा नेटकऱ्यानं कमेंटमध्ये, “24 डिसेंबरला नक्की काय आहे? तर मी वाट पाहतोय.” असं कमेंट केलं आहे.

 

दरम्यान, हृताच्या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
तर हृता आता काय सरप्राईज देणार आहे? यासाठी अनेक चाहते आतुर झाले आहेत.
ती सध्या ‘मन उडू उडू झालं (Man Udu Udu Zal)’ या
मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
तिचा प्रियकर प्रतीक हा या मालिकेचा दिग्दर्शक आहे.

Web Title :- Hruta Durgule | marathi actress hruta durgule share photo with boyfriend director prateek shah said 8 days to go

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास; सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक

Modi Government | गावात राहणार्‍या महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा ! मोफत देणार 5000 रुपयांची ‘ओव्हरड्राफ्ट’ सुविधा, जाणून घ्या कुणाला आणि कधी

Jio-Airtel-VI Plans | स्वस्त पडतो वार्षिक रिचार्ज पॅक ! 1000 रुपयांपर्यंत करू शकता सेव्हिंग; जाणून घ्या Jio, Airtel आणि VI मध्ये कुणाची किंमत सर्वात चांगली?

LIC Jeevan Anand Policy | 1400 रुपये जमा केल्यानंतर मिळतील 25 लाख रुपये, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीची वैशिष्ट्य

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ

Back to top button