… म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मागितली जाहीर माफी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मास्क न घालण्याच्या आपल्या विधानावर ट्विट करुन माफी मागितली आहे. त्यांनी असे लिहिले आहे की, मास्क घालण्याबाबतच्या माझ्या विधानामुळे कायद्याचे अवमान झाल्यासारखे वाटत आहे. हे माननीय पंतप्रधानांच्या भावनांच्या अनुषंगाने नव्हते. माझ्या चुकीबद्दल मला वाईट वाटते. मी स्वतः देखील मास्क घालेन. समाजात सर्व मास्क घालून सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मी करेन.

एका वृत्तसंस्थेने कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘अभी मास्क ही वॅक्सीन’ मोहीम सुरू केली आहे. या संदर्भात, इंदूरमधील एका कार्यक्रमादरम्यान मंत्री नरोत्तम मिश्रा यांना मास्क न घालण्यावर प्रश्न केला असता ते म्हणाले होते की, “या कार्यक्रमातच नाही तर मी कोणत्याही कार्यक्रमात मास्क घालत नाही.”

भोपाळला पोहचल्यावर ते म्हणाले होते की, माझ्या नाकात एक पॉलीपस आहे
माफी मागण्याआधी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा भोपाळ येथे पोचताच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यांच्या नाकात पॉलीपस (टिशू ग्रोथ) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे, मी जास्त काळ मास्क लावू शकत नाही, परंतु आवश्यकतेनुसार मी ते घातलो, असे देखील ते म्हणाले.