शेकडो नागरिकांच्या आरोग्याची तपासणी

पोलीसनामा ऑनलाईन – अतिदुर्गम भागातील आदिवासींना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी पेंढरी तालुका निर्मिती कृती समिती पेंढरी, सिटी हॉस्पिटल सर्जिकल व क्रिटीकल केअर गडचिरोली, रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पेंढरी येथे रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दुर्गम भागातील शेकडो आदिवासी बांधवाच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरात २५ च्या वर नागरिकांनी रक्तदान केले.

शिबिरात जि. प. सदस्य श्रीनिवास दुलमवार, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. किशोर ताराम, डॉ. मनोज मार्गीया, डॉ. लीना खोब्रागडे, पेंढरीचे ठाणेदार मस्कर, पोलीस उपनिरीक्षक पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ अनिल तिडके, पं. स. सदस्य रोशनी पवार, माजी सरपंच अरुण शेडमाके, गट्टाचे सरपंच बावसू पावे, पेंढरीचे ग्रामसेवक जयंत मेश्राम, राहुल शेडमाके, अमर येरमे, संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली येथील सिटी हॉस्पिटल सर्जिकल व क्रिटीकल केअरचे संचालक व सर्जन डॉ. यशवंत दुर्गे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील गरजू व गरीब रुग्णांना मोफत आरोग्याच्या सेवा देण्यासाठी दरवर्षी ४ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून धानोरा तालुक्यातील दुर्गम मानल्या जाणाऱ्या पेंढरी येथे नुकतेच रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत पोटविकार, कर्करोग, शरीरावरील गाठी, स्त्रियांचे विविध आजार अशा अनेक प्रकारच्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार तसेच रक्ताची तपासणी करण्यात आली. या शिबिरात परिसरातील अनेक गावातून शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य केले.

Loading...
You might also like