खून, दरोड्यातील फरार आरोपीचा तीन राज्यांमध्ये शोध 

नगर : पोलीसनामा ऑनलाईन 

दरोडा आणि खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी पपड्या उर्फ राहुल व्यंकटी काळे (५०)यांचा शोध सध्या तीन राज्यांत घेतला जात आहे. जन्मठेपेच्या तब्बल तीन शिक्षा भोगत असलेला पपड्या मुलाच्या लग्नासाठी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. पपड्याने तीस जणांची टोळी बनवून कोळपेवाडी येथील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकून एकाचा खून केला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4d9d47a-be1b-11e8-9884-8d5a4e2462dc’]

या फरार आरोपीच्या टोळीतील सोळा जण अटकेत असून अजूनही चौदा आरोपी फरार आहेत. कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथे लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानावर पपड्या टोळीने दरोडा टाकून तब्बल दीड किलो सोने लुटले होते. दुकानात सराफ श्याम सुभाष घाडगे यांच्यावर गोळीबार करुन त्यांना मारुन टाकले, तर एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नगरच्या गुन्हे शाखेची पथके पपड्यासह त्याच्या टोळीचा शोध घेत आहेत.

चार वर्षांतील पाच लोकहिताची कामे सांगा; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश

त्याच्या सोळा साथीदारांना पकडल्यानंतर पपड्याची माहिती ऐकून पोलीस अधिकारीही चक्रावले होते. दरोडा यशस्वी व्हावा, साथीदार पकडले जाऊ  नयेत म्हणून गोळीबार करुन माणूस मारणे किंवा जखमी करणे ही त्याची कार्यपद्धती आहे. पपड्या हा मूळचा शेकत पांगरी (ता.गेवराई, जि. बीड) येथील असून १९९५ मध्ये तो सलाबतपूर (ता.नेवासे) येथे भाऊ विलास व्यंकटी काळे याच्याकडे रहाण्यास आला होता. राहुल व्यंकटी काळे हे त्याचे खरे नाव असून तो राहुल, महादू, गणपती, संजय, टकल्या, पवन अशी पंचवीस नावे वापरतो.  तो चोऱ्या करत असल्याने जातपंचायतीने त्याला बहिष्कृत केले होते. त्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांवर गोळीबार केला. या गोळीबारात हरसिंग भोसले नावाचा त्याचा नातेवाईक जखमी झाला होता. नेवासे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तो फरार झाला व विदर्भातील वर्धा, यवतमाळ भागात पळून गेला. त्यानंतर या भागात त्याने लूटमार सुरु केली होती. पुणे – नागपूर महामार्गावर रात्री तो आरामबसवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटत असे.

पोलिस पतीवर कॉन्स्टेबल पत्नीकडून बलात्काराचा आरोप

१९९७ मध्येच त्याला लाडखेड (ता. यवतमाळ) या पोलीस ठाण्यातील सातंगे नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने पकडले. त्याचा राग येऊ न पोलीस ठाण्यात येऊ न सातंगे यांचा खून केला होता. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले. १९९७ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला पकडले. त्याच्याकडून सातंगे यांचे सरकारी पिस्तूलही जप्त करण्यात आले. त्याला एकूण सहा बायका आहेत. त्यापैकी लोहगाव (ता.नेवासे) येथील माहेर असलेल्या एका बायकोचा जळगाव भागात त्याने खून केला. पपड्याला बारा मुले असून दरोड्यात त्याचे कुटुंबही सहभागी असते.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ee30c7e-be1d-11e8-bd62-afb084411b64′]