२००० फूट खोल दरीत उडी मारून दाम्पत्याची आत्महत्या, १ वर्षाचा चिमुकला पोरका

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – चिखलदरा येथील भीमकुंड पॉंईंट वरून २००० फूट खील दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज (बुधावारी ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश झगूजी हेकडे (२५) आणि राधा गणेश हेकडे (२२) असे आत्महत्या केलेल्या पति पत्नीचे नाव आहे. या घटनेमुअळे परिसरात खळबळ माजली असून त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या दोघांच्या जाण्यामुळे मात्र त्यांचा एक वर्षाचा मुलगा पोरका झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गणेश आणि राधा यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक वर्षांचा मुलगा आहे. मागच्या तीन आठवड्यांपासून गणेश यांची पत्नी राधा माहेरी मोथा या गावी गेली होती. गणेश तिला घेण्यासाठी गेला होता. गणेशने तिची समजूत काढली होती. हे दोघे दुचाकीवरून घरी निघाले होते. वाटेत ते भीमकुंड पाहण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी या दोघांनी २००० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती समजताच याठिकणी पोलीस दाखल झाले. गणेश आणि राधा यांच्या गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद चालू होते. त्यामुळेच या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You might also like