अनैसर्गिक संबंध ठेवल्याने पतीला अटक 

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन
पत्नीचा विरोध असतानाही जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी मिरजेतील इर्षाद रफीक बारगीर (रा. अलंकार कॉलनी, मिरज) याच्या विरूद्ध मिरज महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला मंगळवारी (दि.२) अटक करण्यात आली. याबाबत ईर्षादच्या पत्नीने पती विरूद्ध तक्रार दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56ef0e7d-c654-11e8-9a19-9f6f49ea3766′]
इर्षाद यांचा २०१२ मध्ये विवाह झाला. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार त्याच्या पत्नीने पती, सासू, सासरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ती विभक्त राहत होती. मात्र लहान मुलाच्या भवितव्यासाठी ती पुन्हा २०१७ मध्ये सासरी राहण्यास आली. त्यानंतर पती ईर्षाद याने विरोध असतानाही जबरदस्तीने अश्‍लिल चित्रफित दाखवून अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवले. त्यामुळे पत्नीला त्रास होऊ लागल्याने आज तिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
[amazon_link asins=’B077RTXJ66,B01G5I8YLC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6556a61b-c654-11e8-aaba-bf66ac0b01d9′]
पोलिसांनी ईर्षाद याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
जाहिरात