धक्कादायक ! रावेतमध्ये आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील रावेत परिसरात पतीने पत्नीच्या डोक्यात हतोडीने घाव घालून निर्घृणपणे खून केला. पत्नीला संपवल्यानंतर स्वत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शिंदेवस्ती येथे बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास उघडकीस आली. कौटंबिक कारणातून पतीने हे टोकाची भुमिका घेतली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईट नोट मिळालेली आहे.

वृषाली संजय लाटे (44, रा. शिंदेवस्ती, रावेत) या महिलेचा खून झाला आहे. तर संजय संजीव लाटे (45, रा. शिंदेवस्ती, रावेत) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली आणि संजय यांना मुलबाळ नाही. त्यामुळे ते शिंदेवस्ती येथे दोघेच राहत होते. संजय हा IT इंजिनिअर होता. तो टेक महिंद्रा या कंपनीत जाॅब करत होता. पती पत्नी दोघेही नेहमीच निराश होते. बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. रावेत पोलिस चौकीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

वृषाली रक्ताच्या थारोल्यात पडल्या होत्या. तर संजय हे गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. घटनास्थळी एक चिट्ठी मिळाली. यामध्ये पत्नीला एक आजार असल्याने ते नेहमी ‘मेंटली डिस्टर्ब’ होती. याचा मला आणि तिलाही खुप त्रास होत होता. त्यामुळे या त्रासला कंटाळून हे पाउल उचलत असल्याचे लिहले आहे. पोलिस तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like