मध्यरात्री पतीला उठवून पत्नी ‘हे’ काम करून घ्यायची, थकल्यामुळं त्यानं मागितला तलाक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किरकोळ कारणांवरून अनेकदा पती पत्नीमध्ये वाद होतं असतात परंतु नंतर हे वाद शांत देखील होतात. परंतु दिल्ली नोएडातील एका तरुणाने आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून तिला घटस्फोट मागितला आहे. नोएडा सेक्टर -34 मधील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांचा विवाह दीड वर्षांपूर्वी करोल बाग मधील एका मुलीसोबत झाला होता. लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित चालले होते.

ऍक्टिंग क्लासला जात होती पत्नी
लग्नानंतर तरुणाच्या पत्नीने अभिनयाचे क्लास लावले होते आणि ती नियमितपणे त्या क्लासला जात होती. तरुणाला त्याबाबत कोणतीही दुविधा नव्हती मात्र क्लासवरून आल्यावर पत्नी सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत असे. टिक टॉक, व्हाट्सएप आणि फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात पत्नीकडून केला जाऊ लागला. यामुळे पती खूपच काळजीत पडू लागला.

त्यानंतर झाली भांडणाला सुरुवात
यामुळे पती पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडणाला सुरुवात झाली. पतीने आरोप केले की पत्नी रात्र रात्र जागून मला टिकटॉक वर व्हिडीओ बनवण्यासाठी कामाला लावत असे तसेच रात्री उशिरापर्यंत फेसबुक आणि व्हाट्सएपवर आपल्या मित्रांशी चॅट करत असे. यामुळे दोघांनामध्ये भांडणाला सुरुवात झाली.

पत्नीने दिली धमकी
त्याचप्रमाणे तरुणाने सांगितले की, केवळ एवढेच नाही तर विरोध केल्यानंतर पत्नीने धमकी देखील दिली की जर तू माझे ऐकले नाहीस तर मी तुझ्यावर लैगिंक छळ केल्याचा खटला देखील टाकेल आणि तुला जेलमध्ये पाठवेल. याबाबतच्या मिळालेल्या माहितीनुसार एवढे सगळे झाल्यानंतर तरुण आपल्या पत्नीबाबत खूपच परेशान झाला शेवटी गाझियाबाद न्यायालयात जाऊन त्याने घटस्फोटाची मागणी केली.

Visit : Policenama.com

You might also like