संतापजनक ! पत्नीच्या अंगावर पहिल्यांदा ‘उकळत’ पाणी फेकलं, मेली नाही म्हणून गळा ‘दाबून’ मारलं अन् पोहचला ‘सासुरवाडीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगाधरी रोडवरील जुन्या पेट्रोल पंपाच्या समोरील दुर्गा विहार कॉलनीत पतीने पत्नीला गरम पाणी ओतून भाजण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिचा मृत्यू झाला नाही, तेव्हा पतीने तिचा गळा दाबून खून केला. इतकेच नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर पती सासरवाडीत पोहोचला. तेथून तो आपल्या सासूसह घरी पोहोचला. मुलीचा मृतदेह पाहून मृताची आई मोठ्याने रडू लागली. हा आवाज ऐकून कॉलनीतील लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना हत्येची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सुमारे दीड वर्षापूर्वी बिलासपूरच्या दुर्गा विहार कॉलनीत राहणाऱ्या विशालसोबत 25 वर्षीय भारतीचा प्रेम विवाह झाला होता. लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांची खूप भांडणं होत असत. यात नातेवाईकांनी हस्तक्षेप करून भांडणं सोडवली देखील पण काही दिवस चांगले गेल्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाले. विशाल पवनी गावात दुचाकी दुरुस्तीचे काम करतो. विशालला भारतीचं कोणाशीही बोलणे आवडत नव्हते. यावरून त्यांच्यात बर्‍याचदा वादविवादही होत असत .रविवारी संध्याकाळी विशाल घरी आला तेव्हा त्याने बाथरूममध्ये पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रॉड लावला, त्यामुळे पाणी खूप गरम झाले. यादरम्यान पती-पत्नीमध्ये एका गोष्टीवरून वाद झाला.रागाच्या भरात विशालने गरम पाणी पत्नीच्या अंगावर ओतले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिचा जीव गेला नाही म्हणून तिचा गळा दाबून खून केला. कुणाला काही काळू नये म्हणून त्याने दरवाजा बंद केला आणि तो सासुरवाडीत गेला.

येथे त्याने सासू अंजूला सांगितले की भारती तिचा फोन उचलत नाही. अंजूने मुलीच्या मोबाईलवर फोन केला पण तिने फोन उचलला नाही. यावर विशाल आपल्या सासूसह बिलासपूरला पोहोचला, तिथे त्याने कसा तरी दरवाजा उघडला. भारतीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. गरम पाण्यामुळे शरीर भाजले होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन विशालची विचारपूस केली. या दरम्यान विशाल घाबरला आणि त्याने भारतीची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like