धक्कादायक ! पतीनं डोक्यात बँट मारल्याने पत्नीचा जागीच मृत्यू

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील कोणत्या तरी कारणाचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बँट मारल्याने पत्नीचा जागीच मुर्त्यू झाला. ही घटना मंगळवारी ( दि.८) सकाळच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील नीरा येथील वार्ड नं. सहा मध्ये घडली. जेजुरी पोलिसांनी आरोपी दस्तगीर सिकंदर पठाण (वय -६५) रा.नीरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नीरा वाँर्ड नं.सहा येथील रहिवाशी दस्तगिर सिकंदर पठाण ( वय-६५) यांनी मागील कोणत्या तरी कारणाचा राग मनात धरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पत्नी जमेला दस्तगिर पठाण ( वय -५७) हिच्या डोक्यात मंगळवारी (दि.८) सकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास

लाकडी बँट मारून खून केला. व त्यानंतर घरातील रक्त पाण्याने व कापडाने पुसून काढले असल्याची फिर्याद मयताचा मुलगा बरकतअली दस्तगीर पठाण यांनी जेजुरी पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी आरोपी दस्तगीर सिकंदर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास नीरा पोलीस दुरक्षेत्राचे फौजदार विजय वाघमारे करीत आहे.