चारित्र्याच्या संशयावरून माथेफिरु पतीने तांब्याच्या तारेने ‘सील’ केला पत्नीचा प्रायव्हेट पार्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उत्तर प्रदेशातील रामपूरमधील एका माथेफिरुने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा प्रायव्हेट पार्ट तांब्याच्या तारेने शिवून काढला. याप्रकरणी कोतवाली मिलकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. तर पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार रामपूर जिल्ह्यात राहणीऱ्या व्यक्तीचा आपल्या पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय होता. या प्रकरणात पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत असे. शनिवारी, एकदा पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि नवरा हिंसक झाला. पतीने पत्नीला मारहाण केली. ती महिला ओरडत राहिली. यावेळी त्यांने पत्नीचा खासगी भाग तारेने शिवून काढला. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या नवऱ्याने तिच्या शरीरावर टाके टाकले, तो मला पापी मानत असे. मी झोपले होते, सकाळी सहा वाजता त्याने माझे हात पाय धरले आणि तोंडात एक कपडा घातला, जेणेकरून माझे रडणे ऐकू नये. मग त्याने तांब्याच्या ताराने टाके टाकले. त्याचवेळी आरोपी पती म्हणतो की पत्नी माझी फसवणूक करीत होती आणि दुसर्‍या व्यक्तीबरोबर तिचे अवैध संबंध होते. मी सकाळी कामावर निघतो आणि माझी पत्नी माझ्या मागे फिरायला जाते. रागाच्या भरात मी तारेने टाके टाकले.

नवऱ्याने आरोप केला की, मी माझ्या पत्नीच्या प्रत्येक गरजा भागविण्यासाठी कठोर परिश्रम करतो, परंतु माझी पत्नी माझ्यासोबत चुकीचे वागत आहे. या संदर्भात पोलिस अधीक्षक शगुन गौतम यांनी सांगितले की, रामपूर जिल्ह्यात एका महिलेने आरोप केला की, तिच्या नवऱ्याने तिच्यावर अत्याचार करून अमानुष कृत्य केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित खटला दाखल करण्यात आला आणि महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महिलेच्या पतीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.