धक्कदायक ! दोघांनी परस्पर विकला हैद्राबादच्या निजामाचा 300 कोटींचा महाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैद्राबादमधील तब्बल 300 कोटींच्या किंमतीच्या निजामाच्या महलाची परस्पर विक्री करण्यात आली आहे. मुंबईच्या एका बांधकाम कंपनीत काम करणाऱ्या दोंघांनी एका काश्मीरच्या हॉटेल व्यावसायिकाला हा महाल विकण्याचा कारनामा केला आहे. त्यानंतर लगेच त्या दोघांनी कंपनीमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत कंपनीने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

कंपनीचे काही कर्मचारी जेव्हा हैद्राबादच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांना या पॅलेसची विक्री झाल्याचे पाहून धक्का बसला. या महालाची मालकी आयरिस हॉस्पिटॅलिटीला देण्यात आल्याचे समजले.

या प्रकरणाची कंपनीने चौकशी केली असता कंपनीतील सुरेश कुमार आणि सी रविंद्र यांचे नाव समोर आले. या दोघांनी हैदराबादच्या मालमत्तेची कंपनीला अंधारात ठेवून विक्री केली आहे. निहारिका कंपनीने ही 100 वर्षे जुनी मालमत्ता तीन वर्षांपूर्वी नजरी बाग पॅलेस ट्रस्टकडून विकत घेतली होती. हैदराबादच्या हैदरगुडामध्ये हा महाल किंग कोठीच्या नावाने प्रसिद्ध होता.

कर्मचाऱ्यांनी कंपनीतील पदाचा गैरवापर करून आणि इतरांना अंधारात ठेऊन अफरातफरी केलीच शिवाय हा प्रकार करून दोघेही कंपनीच्या पदांचा राजीनामा देऊन पसार झाले आहेत.

कसा आहे नेमका हैद्राबादचा हा महाल –
हैद्राबादच्या या महालाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे कारण हैद्राबादच्या शेवटच्या निजामाचे वास्तव्य याच महालात होते. 2.5 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या महालाचे नाव निजामानेच नजरी बागवरून बदलून किंग कोठी ठेवले होते. हा महाल पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून लांबून लांबून येत असत.

visit : Policenama.com