ख्रिस गेल बनला WI कडून सर्वाधिक ‘वनडे’ मॅच खेळणारा पहिला खेळाडू, ‘निवृत्ती छे अजिबात नाही’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युनिव्हर्सल बॉस वन-डे क्रिकेटमधून निवृत्त हो असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच मी संन्यास घेतलेला नाही, आपण खेळतच राहणार असं दस्तुरखुद्द ख्रिल गेलनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी काळात आपण अधिक जोमाने खेळत राहणार असल्याचं देखील त्यानं स्पष्ट केलं आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये बुधवारी मालिकेतील तिसरा वन-डे सामना खेळला गेला. या मॅचमध्ये ख्रिस गेलनं ४१ बॉलमध्ये ७२ धावांची तुफानी खेळी केली. विकेट गेल्यानंतर गेलने बॅटवर हेल्मेट ठेवलं आणि आपल्या वेगळया शैलीत प्रेक्षकांना अभिवादन केलं. सर्व चाहत्यांचा गैरसमज झाला की तो निवृत्त होत आहे. त्यानंतर सोशल मीडियावरही गेलवर शुभेच्छांचा वषत्र्तव झाला. अनेकांनी त्याला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अचानकपणे ख्रिस गेल ट्विटरवर ट्रेन्डमध्ये आला.

दरम्यान, मॅच संपल्यानंतर ख्रिस गेलं आपण निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केलं. ख्रिस गेलचा बुधवारी ३०१ वा वन-डे मॅच होता. वेस्ट इंडिजकडून ३०० हून अधिक वन-डे मॅच खेळणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत वन-डे क्रिकेटमध्ये तब्बल १० हजार ४८० धावा केल्या आहेत. आगामी काळात देखील आपला झंझावत चालु राहणार असून आपण अधिक जोमाने खेळणार असल्याने त्यानं सांगितलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –