मित्रपक्षांची इच्छा असल्यास पंतप्रधान होणार : राहुल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मित्रपक्षांची इच्छा असेल तर आपण निश्चितपणे पंतप्रधान होऊ, असा सर्वसंमतीचा सावध पवित्रा घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी आपण इच्छूक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास छोट्या उद्योजकांना आधार देणे, शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवणे तसेच कमी खर्चात वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांची उभारणी करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीत आधी भाजपचा पराभव, नंतर पंतप्रधानपदाचा विचार करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21961b76-c91d-11e8-a2db-c1fde78c097c’]

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसची भाजपसोबत वैचारिक लढाई आहे. देशातील १३० कोटी नागरिकांवर भाजप कोंडमारा करणारी एकमेव विचारधारा लादू पाहात असून देशवासीयांशी दोन हात करण्याचा विचार करीत आहे. काँग्रेस हा १३० कोटी कल्पनांना चालना देणारा पक्ष आहे. आपले मंदिरात जाणे भाजपला पसंत पडलेले नाही. मंदिर, मशिद आणि गुरुद्वारामध्ये आपण अनेक वर्षांपासून जात आहोत. पण अचानक त्याची चर्चा होत आहे.

भाजप लोकसभेसाठी सेलिब्रेटींना उतरवणार निवडणुक रिंगणात

आगामी लोकसभा निवडणूक ही विरोधी पक्षांसाठी दोन टप्प्यांची प्रक्रिया असेल. पहिल्या टप्प्यात भाजपला पराभूत करणे हेच आमचे लक्ष्य असेल. त्यात यश मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान कोणाला करायचे, याविषयी निर्णय घेतला जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळेल. आजच्या घडीला दोन समस्या आहेत. पहिली नोकऱ्या नाहीत आणि दुसरी म्हणजे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना सरकारने लक्ष्य केले जात आहे. आखाती देशांमध्ये तेलामुळे जशी समृद्धी आली, तशीच समृद्धी भारतात वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील सेवा उपलब्ध केल्याने येऊ शकते, असेही राहुल म्हणाले. मायावतींच्या पक्षासोबत राज्य आणि केंद्राच्या पातळीवर युतीचे प्रयत्न सुरू असताना बसपने अचानक युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला. युती झाली असती तर चांगले झाले असते. पण त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये फरक पडणार नाही आणि आमचा विजय होईल. राजस्थान आणि तेलंगणमध्ये तर काँग्रेस विजयी होणारच आहे. मायावतींच्या पक्ष लोकसभा निवडणुकीत सोबत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de4b6e6f-c91d-11e8-b7ef-6d08e24e043f’]