home page top 1

मी महिलांचा अपमान केला नाही : खा. विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मी कोणत्याही स्त्रीचा अपमान करणार नाही. मी भाषणात बोलताना देखण्या व्यक्तीच हा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यामुळे यामध्ये महिलांचा अपमान करणे हा उद्देश माझा नव्हता. तरीही कोणाला राग आला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दीपाली सय्यद यांच्या टीकेला उत्तर देताना दिली आहे.

दिपाली सय्यद मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन डॉ. सुजय विखे यांनी यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले. याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना सुजय विखे यांनी अपमान केला नसल्याचा दावा केला आहे.

खा. विखे म्हणाले की, साकाळाई योजनेचे श्रेय कुणी घेऊ नये. साकळाई योजना मी आणली आहे. ती योजना भाजपच मार्गी लावणार आहे. यामध्ये जर कोणाला सामील व्हायचे असेल, तर त्यांनी व्हावे. मात्र याचे श्रेय फक्त भाजपला असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Loading...
You might also like