गडकरींनी नेहरूंवर उधळली स्तुती सुमने ; गडकरी काय म्हणाले वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गडकरींच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चलती आहे. त्यांच्या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात एवढी चर्चा आहे कि त्यांना काल माध्यमात हे सांगणे भाग पडले कि माझ्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले जात आहेत आणि आम्ही २०१९ च्या निवडणूका मोदीजींच्या नेतृत्वात लढणार आहोत. आपण माझ्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढू नका. काल माध्यमात अशी भूमिका मांडून त्यांनी पुन्हा नेहरूंवर स्तुती सुमने उधळली आहेत.

“नेहरूंचे ते भाषण मला फार आवडते त्यात ते म्हणाले होते कि भारत हा देश नाही लोकसंख्या आहे. लोकसंख्या हि देशाची समस्या आहे म्हणून मी इतक करू शकतो को मी देशावर ओझे बनून राहणार नाही” असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना गडकरी यांनी हे विधान केले असून त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चा झडण्याची संभावना आहे.

सहिष्णुता या देशाची खूप मोठी देणगी आहे ती आपण सर्वानी जपली पाहिजे  असे नेहरू नेहमी म्हणत असत असे गडकरी म्हणाले आहेत. नेहरूंच्या म्हणण्यानुसार आपण जर देशाच्या कामी नाही आले तर आपण देशावर ओझे बनून राहू आणि देशावरचे ओझे म्हणजे आपण समस्येचे मूळ होऊ असे गडकरी म्हणाले आहेत.

या आधी हि गडकरींनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मागील दोन आठवड्यात गडकरी यांनी धक्कादायक वक्तव्याची मालिकाच सुरु केली आहे. “आमच्या पक्षातील काही लोक आगाव बोलतात त्यांनी आपल्या बोलण्यावर आवर घातला पाहिजे” असे ते म्हणाले होते. तर मागील तीन दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाच्या पाच राज्यांमधील पराभवा बद्दल चांगलेच खोचक वक्तव्य केले होते  “यशाचे अनेक बाप असतात पण अपयश अनाथ असते असे म्हणून त्यांनी आपल्याच पक्षांच्या लोकांना अंतरात्मात बघण्यासाठी संगितले होते. तर एकवेळ हिजड्याला मुले होतील पण राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाहीत असे म्हणून सिंचन प्रकल्पाची झालेली वाताहत स्पष्ट केली होती. तर रविवारी शेतकरी मेळाव्यात बोलताना साखर उत्पादक सांगली जिल्ह्याच्या भागात जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच खडे बोल सुनावले होते.  साखरेचे उत्पादन करायचे थांबवा अन्यथा साखर समुद्रात फेकून द्यावी लागेल असे म्हणत शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला. अशा वक्तव्यांमुळे गडकरी सध्या चर्चेच्या मध्यभागी राहत आहेत.

गडकरी  मोदींच्या नेतृत्वला आवाहन देण्यासाठी अशी वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय जाणकारांनी जरी व्यक्त केलेले असले तरी गडकरींनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.