मोबाईलने केला घात ! अभिनेता सुबोध भावेने नाटकात काम न करण्याचा निर्णय घेतला, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलने अनेकांचे जीवन सुखावह केले असले तरी मोबाईल कोठे, कधी वापरायचा याचे सामाजिक भान प्रत्येकाकडे नसते. भर कार्यक्रमात मोबाईल वाजल्यामुळे कार्यक्रमाचा रसभंग होतो. कार्यक्रम सादर करणारा देखील नाराज होतो. अभिनेता सुबोध भावे देखील यामुळे नाराज झाला आणि त्याने चक्क नाटकात काम न करण्याचाच निर्णय घेतला. नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाईल वाजल्याने अभिनेता सुबोध भावे याने नाटकात काम न करण्याचा निर्णय घेतला. सुबोध भावे यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/subodhbhave/status/1155457304717742080?s=19

सुबोध भावे लिहितो की, अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोन च्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल.

अशा संतप्त आणि उद्विग्न भावना व्यक्त करत सुबोध भावे यांनी नाटक न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुबोध भावे यांच्या अश्रूंची झाली फुले या नाटकाचे सध्या प्रयोग सुरू आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –