मी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार : उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था – ‘मी स्वत: अयोध्येत जाणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिराबाबत आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत, तेच प्रश्न विचारणार’ असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दादरमधील शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी देशात सुरु असणाऱ्या अनेक प्रश्नांबद्दल वक्तव्य केलं तसेच मोदी सरकारवर सडकू टीका केली.

मोदी सरकारवर जोरदार टीका करताना ते म्हणाले की, जो कारभार देशात राज्यात सुरू आहे, ते लोकांना आवडत नाही, मग मी बोलू नको ? 2014 सालची हवा आता राहिली नाही ती बदलली आहे. लोक म्हणतात अच्छे दिन कधी येणार तेव्हा आम्ही हसतो आणि निघुन जातो असा टोला त्यांनी सरकारला लगावला. शिवाय सरकार निर्लज्ज असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं. पुढे ते म्हणाले, धनुष्याबाणाशिवाय रावण दहन करता येत नाही. एवढेच नाही तर धनु्ष्य पेलवण्यासाठी मोठी छाती लागत नाही तर मनगटात ताकद असावी लागते. पंतप्रधान अयोध्येत एकदाही का नाही गेले असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की,जे देश नकाशात कधी पाहिले नाही तिकडे मोदी जातात पण ज्या उत्तर प्रदेशातून निवडून आले त्या भागातील अयोध्येत ते का गेले नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c54c5ab-d2f1-11e8-b518-37630c8b2c32′]

उद्धव ठाकरे म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, स्त्रियांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांचा रावण आजही उभाच आहे. परंतु राम मंदिर अजूनही उभारलं जात नाही. राम मंदिर हा एक जुमला आहे हे एकदाच सांगून का टाकत नाही. जर तुम्हाला राम मंदिर बांधता येत नसेल तर सांगाआम्ही तमाम हिंदूंना एकत्र घेऊन येऊ आणि राम मंदिर बांधू. तुम्ही राम मंदिर उभारु शकत नसाल, तर हे एनडीएचं सरकार नाही, तुमच्या डीएनएतच काही तरी प्रॉब्लेम आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. खोटं बोलून जनतेला फसवत असाल, तर हा एक ज्वालामुखी आहे आणि तो ज्या दिवशी फुटेल, त्या दिवशी सरकार जवळपासही येणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिला.

स्वारगेट पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ?

सरकार कोणतेही असो पेट्रोल, सिलेंडर, महागाई बेरोजागारी हे प्रश्न सुरुच आहेत असे त्यांनी सांगितले. वाढते इंधन दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि महागाईवरुन उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली. तेलाचे दर कमी करणं आमच्या हातात नाही, असं रवीशंकर प्रसाद यांनी मग्रुरपणे सांगितलं. मग तुमच्या हातात आहे तरी काय? तुमच्याकडे विष्णूचा अवतार असूनही महागाई रोखता येत नाही का? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. स्त्रियांवरील अत्याचारांवरही त्यांनी भाष्य केलं. विशेष म्हणजे #MeToo या महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरु असलेल्या मोहिमेलाही उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला. तसेच मी टू मी टू करत बसण्यापेक्षा थेट अत्याचार करणाराच्या कानाखाली द्या असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

[amazon_link asins=’B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’500010a0-d2f2-11e8-b07a-bd3b3b7c3822′]

दुष्काळावर बोलताना उद्धव ठाकरेंनी, कर्नाटकात दुष्काळ जाहीर होतो पण महाराष्ट्रात का नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. लवकरात लवकर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला. लवकरात लवकर सरकारने पाणी चारा हे प्रश्न सोडवण्यास सुरुवात करावी असे म्हणाले. आज शिवसेनेचे मंत्री दुष्काळी प्रदेशात जात आहेत, मुख्यमंत्री म्हणतात मी सगळे अहवाल घेईल. सगळे निर्णय याचे एका रात्रीत होतात मग लोकहिताचे निर्णय घ्यायला यांना वेळ का लागतो असे ते म्हणाले.

[amazon_link asins=’B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b2fdfed-d2f1-11e8-b2a1-e5902fc719ca’]

370 कलम रद्द करण्याच काय झालं? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, रमजान असलं की युद्ध बंदी होते, पण नवरात्री-गणपतीत स्पीकरबंदी होते. आज जे कोणी सत्तेवर आहेत त्यांना सांगा, आज सुद्धा हिंदू मेलेला नाही, जागा आहे. हिंदुहृदयसम्राट हे एकमेव होते जे मैदानात म्हणायचे गर्वसे कहो हम हिंदू है. दसरा मेळावा आहे, विजया दशमीच्या तुम्हाला शुभेच्छा. हे तुमचं प्रेम आहे, माझे काही नाही, ही सर्व शिवसेनाप्रमुख आणि माँ साहेबांची पुण्याई
हे शिवसेनेचं अतिविराट रुप आहे, याचं दर्शन घेतो आणि आगामी काळात दिल्लीवर भगवा झेंडा फडकणारच असेही ते जाता जाता म्हणाले.