लहानपणी म्हशी राखायची, अथक प्रयत्नांनी झाली IAS अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला यश नक्की मिळते, याचेच एक उदाहरण आहे सी.वनमती. वनमतीने आपली घरची परिस्थिती चांगली नसतानाही खूप कष्ट करून आपला अभ्यास पूर्ण केला आणि आयएएस झाली.

सी.वनमती केरळमधील इरोड जिल्ह्यातील रहिवासी असून सामान्य कुटुंबातील एक महिला आहे. सामान्य कुटूंबातील असल्यामुळे वनमती अनेकदा म्हशींना चारण्यासाठी नेत असे त्यांना लागणार चारा पाणी आणत असे. त्यासोबतच वनमती अभ्यासात देखील खूप हुशार होती.

बारावी नंतर लग्नासाठी होता घरच्यांचा आग्रह
बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वणमतीवर तिच्या घरच्यांकडून लग्नासाठी दबाव येऊ लागला. यावेळी त्यांनी गंगा यमुना नावाची मालिका पहिली त्यामधील नायीका आयएएस होती. तेव्हाच वनमतीने ठरवले की आपल्याला देखील आयएएस व्हायचे.

UPSC तयारी सुरु केली
आयएसएसची तयारी सुरु करण्याआधी वनमतीने आपले शिक्षण पूर्ण केले होते. घरातील मदतीसाठी त्यांनी एका बँकेत देखील नोकरी केली मात्र आपला अभ्यास सुरूच ठेवला.

मुलाखतीच्या दिवशी वडील होते ऍडमिट
मुलाखतीच्या दोन दिवस आधी वनमतीच्या वडिलांची अचानक तब्बेत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. असे असूनही वनमतीने आपल्या वडिलांच्या तब्ब्येतीकडे लक्ष देऊन सुद्धा आपली मुलाखत दिली.

दुसऱ्या प्रयत्नात मिळाले यश
वनमती ने जेव्हा पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. परंतु तरीही त्या हारल्या नाहीत त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि शेवटी 2015 मध्ये त्यांना यश मिळाले, युपीएसची परीक्षा यशवीपणे पार केली.

Visit : Policenama.com