इंग्लंडमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना खेळाडूंची नाही तर ‘यांची’ भीती !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विश्वचषकाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वच संघानी यासाठी जोरात तयारी सुरु केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू वेगळ्याच कारणामुळे चिंतेत आहेत. हे दोन खेळाडू म्हणजे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ. या दोघांना जी चिंता सतावत आहे कि ती म्हणजे इंग्लंडमधील प्रेक्षकांकडून टार्गेट करणे. वेगवान गोलंदाजांचा सामना करणे त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही.

मात्र इंग्लंडमधील स्थानिक प्रेक्षकांचा सामना करणे त्यांना अवघड जाणार आहे. याला कारणही तसेच आहे. हे दोघेही गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी आढळले होते. त्यानंतर दोघांवरही एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यावरुन दोघांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता ऑस्ट्रेलियन संघाला वाटते.

याविषयी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी बोलताना म्हटले कि, या दोघांना इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. या दोघांनी या प्रकरणात खूप काही सहन केले आहे. मात्र ते दोघे आता यासाठी तयार आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. दोघेही नुकतेच आयपीयलमध्ये खेळून इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या विश्वचषकात या दोघांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, या दोघांच्या समर्थनासाठी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा पुढे आला आहे. त्याने इंग्लंडमधील प्रेक्षकांना यासंदर्भात आवाहन केले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथवर खाजगी टीका करू नका,असे आवाहन त्याने प्रेक्षकांना केले आहे. २०१५ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोईन अलीला ओसामा बिन लादेन म्हणून डिवचण्यात आले होते.