ICCने जारी केली ही आकडेवारी, पाकिस्तान ‘अव्वल’ तर भारतीय संघ तळाला

इंग्लंड : वृत्तसंस्था – आयसीसी विश्वचषकाचा ज्वर सर्वत्र आहे. आयसीसी सतत नवनवीन रेकॉर्ड आणि गुणतालिका तसच वेगवेगळ्या गोष्टींमधील चढउतार सांगत असते. क्रिकेटमधील वेगळीच क्रमवारी समोर आली आहे. या क्रमवारीत भारत तळाशी म्हणजे सर्वांत शेवटी आहे तर पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. हे ऐकूण सर्वांच्या भुवया उंचवल्या असतीलच. पण ही आकडेवारी भारतीय चाहत्यांसाठी आंनददायीच आहे.

क्रिकेटमध्ये असं म्हणतात की ‘कॅचेस विन मॅचेस’. त्यानुसार संघातील खेळाडू जितके जास्त झेल टिपतात, तितका तो संघ सामना जिंकण्याची शक्यता देखील वाढते. या क्रमवारीत झेल सोडण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. तर भारत एकदम तळाशी आहे. आकडेवारीनुसार यंदाच्या वर्ल्डकप मध्ये पाकच्या संघाकडून आतापर्यंत एकूण १४ झेल सुटले आहेत. तर भारताकडून सर्वात कमी म्हणजे फक्त १ झेल सुटला आहे.

झेल सोडण्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर यजमान इंग्लंडचा संघ आहे. इंग्लंडने १२ झेल सोडले आहेत. तर त्या खालोखाल न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज हे संघ आहेत. तसंच ऑस्ट्रलिया आणि बांगलादेश हे दोन्ही देश एकाच स्थानावर आहेत. त्यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशचा नंबर लागतो. या नुसार भारताने केलेली कामगिरी ही भारतासाठी उत्तमच आहे. त्यामुळे भारताचे जिंकण्याचे संकेत अधिक वाढत आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ मंगळवारी उपांत्य फेरीत पोहोचला. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला. भारतीय संघदेखील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

कोणत्या संघाने किती झेल सोडले-
पाकिस्तान – १४
इंग्लंड – १२
न्यूझीलंड – ९
दक्षिण आफ्रिका – ८
विंडीज – ६
ऑस्ट्रलिया – ४
बांगलादेश – ४
श्रीलंका – ३
अफगाणिस्तान – २
भारत – १