ICC World Cup 2019 : विंडीजच्या पराभवानंतर ‘या’ ३ संघाचा टीम इंडियाच्या कामगिरीवर ‘वॉच’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सर्व सामने जवळपास पार पडत आले असून या आठवड्याच्या शेवटी आपल्याला सेमीफायनलमधील चार संघ समजतील. काल श्रीलंका आणि वेस्टइंडीज यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने विंडीजला पराभूत केल्यानंतर आता त्यांना सेमीफायनलची आस लागली आहे. काल विंडीजला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेचे ८ गुण झाले असून त्यांना देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यांचा पुढील सामना हा भारताशी होणार असून या सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे.

सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी असून इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत भन्नाट फॉर्ममध्ये असून त्यांनी फक्त भारतीय संघाविरुद्धचा सामना गमावला असून त्यांनी याआधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असल्याने आता त्यांना धोका नाही. त्यामुळे आता श्रीलंका देखील या रेसमध्ये सामील झाली असून आता त्यांना देखील इतर संघांच्या जय पराजयावर अवलंबून रहावे लागणार आहे.

भारताविरुद्धच्या सामना जिंकल्यानंतर देखील श्रीलंकेला पाकिस्तान, बांगलादेश आणि इंग्लंडचा पराभव होण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र या सगळ्यात श्रीलंकेचा रनरेट फार कमी असल्याने या सगळ्या संघाना हे सामने मोठ्या फरकाने गमवावे लागणार आहेत. तरच श्रीलंकेचे सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र त्याचबरोबर चौथ्या क्रमांकासाठी चार संघांत टक्कर असून वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, पाक आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धा आहे. त्यामुळे आता या तिघांमध्ये श्रीलंका देखील या स्थानासाठी प्रयत्न करताना दिसून येणार आहे.

दरम्यान, इंग्लंड त्यांचा शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार असून या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागल्यास त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा सामना बांग्लादेशबरोबर होणार असून बांगलादेशचा आज भारताबरोबर सामना होणार आहे. जर ही सगळी गणिते जुळून अली तर श्रीलंकेसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

‘बीफ’ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

‘किवी’ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

शांत झोपेसाठी रात्री करा ही ‘आसने’