तब्बल १४२ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये ‘हे’ आमूलाग्र बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेटचे महत्व अजूनही अबाधित आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीमध्ये मोठा बदल होणार आहे. यापुढे कसोटी क्रिकेट यापुढे वन-डे आणि टी-२० क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या जर्सीमागे त्यांचं नाव व क्रमांक लिहीला जाणार आहे. १ ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या ‘Ashes Test Cricket’ मालिकेपासून हा बदल केला जाणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १४२ वर्षांनी हा बदल होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांना खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर टाकण्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. कसोटी क्रिकेटला अधिक प्रसिद्धी मिळावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्लबही शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत आपल्या व्हाइट जर्सीवर नाव आणि नंबर घालून खेळतात. आता हाच फॉर्म्युला कसोटी क्रिकेटमध्येही गिरविला जाणार आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ जेव्हा वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायला उतरेन, तेव्हा भारतीय खेळाडूंच्या व्हाइट जर्सीवर त्यांचे नाव आणि नंबर असणार आहे.

१८७७ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक टाकले होते. मात्र त्यानंतर खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक टाकणे बंद करण्यात आले होते.