Icc world cup 2019 : ‘गब्बर’ची सेंचुरी भारताकडून धावांचा डोंगर ; ऑस्ट्रेलियापु़ढे ३५३ धावांचे लक्ष

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकप सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाच्यासमोर ३५३ धावांचे आव्हान उभारले आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरवात करून दिली. दोघांनी १२७ धावांची भागीदारी केली.

शिखर धवनने ११७ धावांची शतकी खेळी करत जबरदस्त पुनरागमन केले. त्याने १०९ चेंडूंमध्ये १६ चौकाराच्या मदतीने ११७ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. धवनला ५७ धावा करून रोहित शर्माने चांगली साथ दिली. ही सलामीची जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने रचलेल्या भागीदारीमुळे भारताने ३०० धावांचा टप्पा सहज पार केला.

धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्याने जबरदस्त फलंदाजी करत २६ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकाराच्या मदतीने ४८ धावा केल्या. मोठा फटका मारण्याच्या नादात पांड्या ऍरॉन फिंच च्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार विराट कोहलीने देखील ८२ धावांची शानदार खेळी केली. महेंद्रसिंग धोनीने २७ धावांचे योगदान दिले.

भारत वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त शतक करणारा संघ
शिखर धवनच्या शतकासोबतच भारताने वर्ल्डकपमध्ये २७ शतक पूर्ण केले आहेत. यामुळे भारत हा वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त शतक करणारा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलिया २६ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.