ICC World Cup 2019 : ‘या’ सामन्यानंतर माही महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमधून निवृत्‍त, BCCIची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करत असून या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने प्रवेश केला असून या स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. मात्र भारतीय संघाचा या स्पर्धेतील अंतिम सामना कोणता असेल हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे भारतीय क्रीडा रसिकांचे याकडे डोळे लागून आहेत. आज दुपारीच भारताचा फलंदाज अंबाती रायडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता भारतीय चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे.

भारतीय संघाचा या स्पर्धेतील जो सामना अंतिम असेल तोच सामना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा देखील कारकिर्दीतील अंतिम सामना असेल अशी माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या एका मोठ्या अधिकऱ्याने याबाबतीत खुलासा केला आहे. यानंतर भारतीय प्रेक्षक आणि धोनीचे चाहते त्याला भारताच्या निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये पाहू शकणार नाही.

जर भारतीय संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचला तर कदाचित महेंद्रसिंग धोनी याचा देखील हा अंतिम सामना असेल. मात्र या सगळ्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यात असून नक्की काय होणार हे कुणालाही माहित नाही. त्याचबरोबर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास हा वर्ल्डकप जिंकून धोनीला निरोप देण्यासारखी दुसरी कोणती गोष्ट नसेल. याविषयी अधिक बोलताना या अधिकाऱ्याने म्हटले कि, धोनी काय निर्णय घेईल हे कुणीही सांगू शकत नाही मात्र या स्पर्धेनंतर देखील धोनी क्रिकेट खेळेल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे त्याने कसोटी सामन्यांतून निवृत्त होण्याचा निर्णय अचानक घेतला होता त्याचप्रमाणे हा निर्णय देखील घेऊ शकतो.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी याने २०१४ मध्ये कसोटी सामन्यांतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर २०१७ मध्ये एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांचे कर्णधारपद देखील तडकाफडकी सोडले होते.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती