ICC World Cup 2019 : ‘हॅट्रिक’ घेतल्यानंतर देखील सचिन तेंडुलकरला ‘टीम इंडिया’मध्ये मोहम्मद शमी नको !

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम १२ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ११ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्सह तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे तीन संघ सेमीफायनलमध्ये जवळपास नक्की समजले जात आहेत. त्याचबरोबर भारत देखील जबरदस्त फॉर्ममध्ये असून उद्या भारतीय संघाचा वेस्ट इंडिजबरोबर सामना होणार आहे. त्याआधी भारतासाठी समाधानाची बाब असून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा फिट झाला असून काल त्याने सराव करताना गोलंदाजी देखील केली. मात्र भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा मोहम्मद शमी याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅट्रिक घेत आपण या जागेसाठी तयार असल्याचे सांगताना भारतीय संघात आपण योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिल्याने सध्यातरी भारतीय संघाला चिंता करण्याची गरज नाही. मात्र भुवनेश्वर फिट झाल्याने आता या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची याची चिंता वाढली आहे. त्यावर आता भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने आपले मत व्यक्त केले आहे.

ADV

काय म्हणाला सचिन
या विषयावर बोलताना सचिन म्हणाला कि, शमी जरी उत्तम खेळ करत असलातरी भुवनेश्वर फिट असल्याने त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी द्यावी. भुवनेश्वर भारतीय संघाची पहिली पसंद असून उद्या होणाऱ्या सामन्यात ख्रिस गेलच्या समोर भुवनेश्वरच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे ख्रिस गेलसमोर चेंडू आऊटस्विंग करणारा गोलंदाज आहे. ख्रिस गेलला तो उत्तमरीत्या हाताळू शकतो.
दरम्यान, वेस्ट इंडीजसमोर भुवनेश्वरची कामगिरी दमदार असून विंडीजविरुद्ध खेळलेल्या १५ सामन्यांत त्याने १५ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सामन्यात संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक