Post_Banner_Top

क्रिकेट वर्ल्डकप २०१९ :जाणून घ्या कोण कोणाविरुद्ध खेळणार

मुंबई : पोलिसनामा  ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते.

त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात.यावेळेस राऊंड रॉबिन फॉर्मेट पद्धतीने संध एकमेकांशी भिडणार आहेत. या फॉरमॅटमध्ये प्रत्येक संघाला कमीत कमी एकदा अन्य ९ संघासोबत एकतरी सामना खेळायचा आहे.याचाच अर्थ प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे.

त्यामुळे सर्व संघाना  यावेळी सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची  संधी आहे. राऊंड रॉबिन फॉर्मेट पद्धतीत सर्व संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतात आणि त्यानंतर  गुणतालिकेत सर्वात वर असणारे  चार संघ सेमीफायनलमध्ये  प्रवेश करतात. पहिला सामना ३० मे  रोजी तर अखेरचा सामना  १४ जुलै  रोजी खेळवला जाणार आहे. तर चला जाणून घेऊयात क्रिकेटच्या या महाकुंभाचा संपूर्ण कार्यक्रम

सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

१) इंग्लंड विरुद्ध द. आफ्रिका – ३० मे- लंडन – दुपारी ३ वाजता
२) पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज – ३१ मे – नॉटिंग्हम – दुपारी ३ वाजता
३) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका – १ जून – कार्डिफ – दुपारी ३ वाजता
४) अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १ जून – ब्रिस्टल – संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
५) बांगलादेश विरुद्ध द. आफ्रिका – २ जून – लंडन – दुपारी ३ वाजता
६) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान – ३ जून – नॉटिंग्हम – दुपारी ३ वाजता
७) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – ४ जून कार्डिफ – दुपारी ३ वाजता
८) भारत विरुद्ध द.आफ्रिका – ५ जून – साऊथम्प्टन – दुपारी ३ वाजता
९) बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड – ५ जून – नॉटिंग्हम – दुपारी ३ वाजता
१०) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडीज – ६ जून – नॉटिंग्हम – दुपारी ३ वाजता
११) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – ७ जून – ब्रिस्टल – दुपारी ३ वाजता
१२) इंग्लंड विरुद्ध बांगलादेश – ८ जून – कार्डिफ – दुपारी ३ वाजता
१३) अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड – ८ जून – टॉन्टन- संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
१४) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ९ जून – लंडन – दुपारी ३ वाजता
१५) वेस्ट इंडिज विरुद्ध द. आफ्रिका – १० जून – साऊथम्पटन – दुपारी ३ वाजता
१६) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – ११ जून- ब्रिस्टल – दुपारी ३ वाजता
१७) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान १२ जून टॉन्टन – दुपारी ३ वाजता
१८) भारत विरुद्ध न्यूझीलंड – १३ जून – नॉटिंग्हम – दुपारी ३ वाजता
१९) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज – १४ जून – साऊथम्पटन – दुपारी ३ वाजता
२०) ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका – १५ जून – लंडन – दुपारी ३ वाजता
२१) अफगाणिस्तान विरुद्ध द. आफ्रिका – १५ जून – कार्डिफ – संध्याकाळी ६ वाजता डे नाईट
२२) भारत विरुद्ध पाकिस्तान – १६ जून – मँचेस्टर – दुपारी ३ वाजता
२३) बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज – १७ जून – टॉन्टन – दुपारी ३ वाजता
२४) अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड – १८ जून – मँचेस्टर – दुपारी ३ वाजता
२५) न्यूझीलंड विरुद्ध साउथ अफ्रीका – १९ जून – बर्मिंग्हम – दुपारी ३ वाजता
२६) ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश – २० जून – नॉटिंघम – दुपारी ३ वाजता
२७) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका – २१ जून – लीड्स – दुपारी ३ वाजता
२८) भारत विरुद्ध अफगाणिस्तान – २२ जून – साऊथम्पटन – दुपारी ३ वाजता
२९) न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडीज – २२ जून – मँचेस्टर – संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
३०) पाकिस्तान विरुद्ध साउथ अफ्रीका – २३ जून – लंडन – दुपारी ३ वाजता
३१) अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश – २४ जून – साऊथम्पटन – दुपारी ३ वाजता
३२) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २५ जून – लंडन – दुपारी ३ वाजता
३३) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – २६ जून – बर्मिंग्हम – दुपारी ३ वाजता
३४) भारत विरुद्ध वेस्टइंडीज – २७ जून – मँचेस्टर – दुपारी ३ वाजता
३५) द. आफ्रिका विरुद्ध श्रीलंका – २८ जून – चेस्टर ले स्ट्रीट – दुपारी ३ वाजता
३६) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान – २९ जून – लीड्स – दुपारी ३ वाजता
३७) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड – २९ जून – लंडन – संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
३८) भारत विरुद्ध इंग्लंड – ३० जून – बर्मिंग्हमन – दुपारी ३ वाजता
३९) श्रीलंका विरुद्ध वेस्टइंडीज – १ जुलै- चेस्टर ले स्ट्रीट – दुपारी ३ वाजता
४०) भारत विरुद्ध बांग्लादेश – २ जुलै- बर्मिंग्हम – दुपारी ३ वाजता
४१) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड – ३ जुलै- चेस्टर ले स्ट्रीट – दुपारी ३ वाजता
४२) अफगाणिस्तान विरुद्ध वेस्टइंडीज – ४ जुलै- लीड्स – दुपारी ३ वाजता
४३) पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश – ५ जुलै- लंडन – संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
४४) भारत विरुद्ध श्रीलंका – ६ जुलै- लीड्स – दुपारी ३ वाजता
४५) ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका – ७ जुलै- मँचेस्टर – संध्याकाळी ६ वाजता डे-नाइट
पहला सेमीफाइनल – ९ जुलै- मँचेस्टर – दुपारी ३ वाजता
दूसरा सेमीफाइनल – ११ जुलाई- बर्मिंग्हम – दुपारी ३ वाजता
फायनल – १४ जुलै- लंडन (लॉर्ड्स) – दुपारी ३ वाजता

दरम्यान ,यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आधीच्या तुलनेत संघांची संख्या घटवण्यात आली आहे. याआधी वर्ल्डकपमध्ये १२ ते १४ संघ भाग घेत होते. यावेळी मात्र फक्त १० संघांनाच प्रवेश देण्यात आला आहे.

Loading...
You might also like