ICC World Cup 2023 | भारत भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांत रंगणार सामना

पोलीसनामा ऑनलाईन : ICC World Cup 2023 |ऑस्ट्रेलियात (Australia) नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये (T-20 World Cup) पाकिस्तानवर (Pakistan) मात करून इंग्लंडने (England) विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. इंग्लंडने सलग दोनवेळा वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला आहे. भारताला यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपच्या नॉक आऊट फेरीत पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेनंतर बीसीसीआयने (BCCI) आगामी होणाऱ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियात बदल केले जातील, असे जाहीर केले आहे. यानंतर आता आगामी होणाऱ्या मर्यादीत षटाकांतील वन डे फॉर्मेटच्या वर्ल्डकपकडे (ICC World Cup 2023) सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेचं (ICC World Cup 2023) यजमानपद भारताकडे (India) असणार आहे. याअगोदर भारताने शेजारील देश पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्डकपचे आयोजन केले होते. भारताने 1987, 1996, आणि 2011 मध्ये वर्ल्डकपचं यजमानपद भूषवलं आहे. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपचं आयोजन भारत स्वत:च करणार आहे. त्यामुळे 2023 मध्ये भारत पहिल्यादांच दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता एकटा भारत पहिल्यांदाच वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे. भारतातील दहा शहरांमध्ये या वर्ल्डकपचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.

वर्ल्डकप 2023 चा शेड्यूल

आयसीसीकडून (ICC) वर्ल्डकपसारख्या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन 2023 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामना 24 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल आणि स्पर्धेचा अंतिम सामना 26 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. हे सामने कोणत्या 10 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे चहाला जाणून घेऊया…

1) इकाना स्टेडियम, लखनौ (Ikana Stadium, Lucknow)

2) ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर (Green Park Stadium, Kanpur)

3) इडेन गार्डन, कोलकाता (Eden Gardens, Kolkata)

4) एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai)

5) अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली (Arun Jaitley Stadium, Delhi)

6) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad)

7) राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi Stadium, Hyderabad)

8) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai)

9) पीसीए स्टेडियम, मोहाली पंजाब (PCA Stadium, Mohali Punjab)

10) एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरू (M Chinnaswamy Stadium, Bangalore)

Web Title :-  ICC World Cup 2023 | icc 2023 world cup in india match will be played in ten cities icc cricket tournaments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

Pune Crime | तडीपार गुंडाचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण खून; कोंढव्यातील अशोका म्युज सोसायटीजवळील घटना