वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये लठ्ठपणा या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आला की, मधुमेह, हृदयरोग पाठोपाठ येतातच. त्यामुळे लठ्ठपणा ही समस्या सध्या गंभीर बनली आहे. लठ्ठपणा हा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. लठ्ठपणा टाळला, वजन नियंत्रणात ठेवले तर कोणताही आजार तुमच्या जवळपास फिरकणार नाही. यासाठी व्यायाम आणि योग्य आहार गरजेचा आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आइस थेअरपी उपयोगी आहे. या थेरपीबाबत आपण माहिती घेणार आहोत.

शरीरातील काही खास अवयवांवरील फॅट बर्न करण्यासाठी बर्फाचा वापर करण्यात येतो. यास आइस थेरपी असे म्हणतात. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, शरीराच्या काही अवयवांवर बर्फ लावल्याने फॅट बर्न होते. शरीराच्या ज्या अवयवांवर जास्त प्रमाणात चरबी जमा झाली असेल. त्यांना स्लिम आणि फिट करण्यासाठी आइस थेरपी मदत करते. आइस थेरपी टिश्यू टाइट करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. आइस थेरपीचा उपयोग करण्यासाठी आइस बॅग्स, जेल पॅक्स आणि इतर पद्धतींनी फॅट बर्न करता येते. घरच्या घरी ही थेरपी करण्यासाठी एका झिप लॉक बॅगमध्ये काही बर्फाचे तुकडे घ्यावे आणि ज्या ठिकाणी जास्त चरबी जमा झाली आहे, त्या ठिकाणी लावावी. झिप लॉक बॅग नसल्यास बर्फाचे तुकडे कपड्यामध्ये गुंडाळूनही वापरता येतील. या थेरपीला आणखी प्रभावी करण्यासाठी बर्फाचा वापर करण्याआधी त्वचा मातीच्या मदतीने स्वच्छ करून घ्यावी. यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. त्यानंतर बर्फाचा वापर करू शकता.

तसेच बाजारात पाण्याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे ऑइल्स, हर्ब यांपासून तयार केलेला बर्फ मिळतो. त्याच्या वापराने वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होते. मात्र, कधीही थेट त्वचेवर बर्फाचा वापर करू नका. बर्फ वापरताना एखाद्या झिप लॉक बॅगमध्ये किंवा कपड्यामध्ये गुंडाळून त्यांचा वापर करावा.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like