‘या’ खासगी बँकेनं ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी ग्राहकांना दिली मोठी भेट, दरमहा EMI वर होईल बचत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ICICI बँकेने मुख्य कर्जाचे दर 0.05 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. EMI वर दरमहा 0.05 टक्के बचत होईल. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. सप्टेंबरमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेने कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत. दोन्ही बँकांनी 0.05 टक्के कपात केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेनेही एमसीएलआरमध्ये 0.10 टक्के कपात केली आहे.

ICICI बॅंकेचे नवीन फेस्टिव्ह ऑफर-

ICICI बँकेने नुकतेच फेस्टिव्ह बोनान्झा लॉन्च केले आहे, ज्यामध्ये बरेच ऑफर्स येत आहेत. मोठ्या ब्रँड आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन प्रोडक्टच्या खरेदीवर सूट आणि कॅशबॅक मिळत आहेत.

रिटेल आणि बिझनेस ग्राहकांना बऱ्याच बँकिंग प्रोडक्ट आणि सेवांवर आकर्षक लाभ मिळत आहेत. काही ऑफर 1 ऑक्टोबर 2020 पासून उपलब्ध असतील तर काही उत्सवाच्या काळात काही तारखेला येतील.

लोन प्रो़क्टवर मिळणारे बेनेफिट्स-

ICICI बँक होम लोन आणि इतर बँकांकडून होम लोनचे बॅलेन्स ट्रान्सफर केल्यास आकर्षक व्याज दर (रेपो रेट लिंक्ड) 6.90 टक्क्यांपासून सुरू होईल आणि प्रोसेसिंग फी 3,000 पासून सुरू होईल.

ऑटो लोनमध्ये ग्राहकांना फ्लॅक्सिबल स्कीम्स मिळतील. EMI 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 1 लाख 444 रुपये आहे. महिला ग्राहकांसाठी फ्लॅट प्रोसेसिंग फी 1,999 आहे. टू व्हिलर लोनवर EMI 36 महिन्यांच्या कार्यकाळात 36 रुपये प्रति 1,000 रुपये आहे, जे कमी आहे. तेथे 999 रुपयाची स्पेशल प्रोसेसिंग फी आहे.

इन्स्टंट पर्सनल लोनवर व्याज 10.50 टक्के पासून सुरू आहे आणि त्यावर 3,999 रुपये प्रोसेसिंग फी आहे. होम अप्लायंसेज आणि डिजिटल प्रोडक्टच्या प्रमुख ब्रँडवर नो कोस्ट ईएमआय उपलब्ध आहे. रिटेल ग्राहकांना आणि बिझनेस ग्राहकांना दिलेल्या ऑफरमध्ये लोनच्या प्रोसेसिंग फीमध्ये सूट, कमी EMI, गिफ्ट व्हाउचर आणि इतर फायदे समाविष्ट आहेत.

बँकेने मोठ्या ब्रॅण्डसोबत करार केला आहे. ICICI बँक क्रेडिट / डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि डिजिटल वॉलेट बँकिंग पॉकेटच्या युजर्सलाही याचा लाभ मिळत आहे. यात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम आणि टाटा क्लिकवर 10 टक्के सूट आहे.