Coronavirus : ICMR चा मोठा निर्णय, टीबी तपासण्याच्या मशिननं होणार ‘कोरोना’ व्हायरसची टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणं लक्षात घेता अधिकाधिक लोकांची तपासणी करण्याची तयारी सुरू आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देखील टीबी स्क्रीनिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीनने कोविड-१९ च्या तपासणीला मान्यता दिली आहे. ICMR ने घेतलेल्या या निर्णयामुळे टीबी स्क्रीनिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या मशीन्स आता कोरोना व्हायरसला शोधण्यासाठी वापरता येणार आहेत. आयसीएमआरने या तपासणीत काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. भारतात टीबी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही मशीन वापरली जाते, ज्यामुळे औषधाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ट्रुनॅटटीएम बीटा सीओव्ही चाचणीस मान्यता देत आयसीएमआरने म्हटले आहे कि या चाचणीचा वापर आता कोरोना संक्रमित रूग्णांसाठीही केला जाऊ शकते.

आयएमसीआरने आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, या तपासणी दरम्यान नाक आणि घशातील सॅम्पल घेऊन याला किटसह दिल्या गेलेल्या ट्रान्सपोर्ट मिडीयममध्ये ठेऊन पाठवले जाईल. या तपासात जे रुग्ण कोरोना संक्रमित आढळतील त्यांना आरटी-पीसीआर द्वारे चाचणी करून कोरोनाची पुष्टी केली जाईल. या दोन्ही टेक्निकचा वापर टीबी रुग्णांच्या तपासणीसाठी केला जातो. देशात याच्या अनेक मशिन्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे आता कोरोना संक्रमित रुग्णांचा तपास करणे सोपे होईल.

काँडम तयार करणाऱ्या कंपन्यांना मिळाले टेस्ट किट बनवण्याचे कंत्राट, दररोज बनवणार २० हजार युनिट –
भारतात कोरोनाची प्रकरणं दररोज वाढत असून शुक्रवारी कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ७००० च्या जवळपास पोहोचली. गेल्या २४ तासांत याने आत्तापर्यंतच्या सर्व आकडेवारीला मागे टाकले आहे. शुक्रवारी देशभरात कोरोनाची ८५९ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून आतापर्यंत ६७६१ लोकांना भारतात कोरोनाची लागण झाली असून त्यातील २०६ लोकांचा मृत्यू झाला आहे.