सत्तासंघर्ष ! 48 तासानंतर राज्यपालांसमोर ‘हे’ 11 पर्याय असू शकतात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राजकीय घडामोडी वेगवान असतील. उद्या संध्याकाळपर्यंत जर सत्ता स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. काही घटना तज्ज्ञांच्या मते राज्यात पुन्हा निवडणूका होऊ शकतात. तर काहीच्या मते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही याची खबरदारी राजकीय पक्षांनीच घ्यावी.

उद्या सत्तेचा दावा न केल्यास शनिवारनंतर राज्यात काय परिस्थिती असू शकते याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांचे मत विचारात घेण्यात येत आहे. राज्यात मुख्यमंत्री नियुक्त करण्याची जबाबादारी राज्यपालांची असल्याने ते सर्वात मोठ्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्याची संधी देतील. त्यात जर अपयश आले तर राज्यपाल दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला बोलावून किंवा इतर बहुमताचा दावा करणाऱ्या पक्षाला बोलावून बहुमत सिद्ध करण्याची संधी देतील. असे घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप यांनी सांगितले. राष्ट्रपती राजवट हा पहिला नव्हे तर शेवटचा पर्याय असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

उद्यापर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास काय असणार पर्याय –

1) उद्यापर्यंत कोणताही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर शनिवारनंतर राज्यपाल दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करतील.

2) राज्यात सर्वात मोठा पक्ष सत्ता स्थापनेसाठी पुढे आला तर त्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी काही ठराविक कालावधी मिळेल.

3) विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने पुढील सरकार लगेचच स्थापन होईल, ते बंधनकारक आहे. त्यासाठी मुदत वाढूवन देण्याची घटनेत तरतूद देखील आहे.

4) तो पक्ष सरकार स्थापन होण्यास अपयशी ठरला तर दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारला सत्ता स्थापनेची संधी मिळेल.

5) इतर पक्षांना देखील सत्ता स्थापनेचा कालावधी दिला जाऊ शकतो.

6) जर सत्ता स्थापनेची प्रक्रिया लांबल्यास काळजीवाहू सरकारवर जबाबादारी देण्यात येईल. त्यानंतर नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार राज्याचे कामकाज चालवेल.

7) परंतू काळजीवाहू सरकार कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही.

8) आमदार झालेल्यांच्या विधानसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा काळजीवाहू सरकारच्या काळात हंगाम अध्यक्षांची नेमणूक करुन घेण्यात येईल.

9) काळजीवाहू सरकार कोणतीही कालमर्यादा नाही.

10) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याचा कार्यकाळ 6 महिने ते 3 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो.

11) राष्ट्रपती राजवट लागू असताना या घडामोडी दरम्यान पक्षाने पुरेसे संख्याबळ सादर केले तर राष्ट्रपती राजवट उठवली जाऊ शकते.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके