भारतात डॉक्टरांची मोठी ‘कमतरता’, ‘कोरोना’ व्हायरस फोफावला तर ‘हाहाकार’ माजणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस भारतात महामारी सारखा पसरला तर देशात इतके डॉक्टर आहेत का की जे त्यासाठी संघर्ष करु शकतील ? कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 64,434 लोक बाधित आहेत. यातील 63,851 तर चीन मधील आहेत. (कोविड 19) कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1383 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 1380 लोक तर चीनमधील आहेत.

भारतात डॉक्टरांची संख्या कमी आहे. देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जवळपास 41.32 टक्के डॉक्टरची कमी आहे. म्हणजे सरकारकडून एकूण 158,417 पद स्वीकृत आहेत यातील 65,467 पद अद्यापही रिक्त आहेत. कोरोना व्हायरस पसरला तर डॉक्टरांच्या संख्येमुळे ही महामारीशी वाढू शकते. तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या 82 टक्क्यांनी कमी आहे.

आरोग्य जाणकार अरविंद मिश्रा म्हणाले की सरकारने ग्रामीण आरोग्यासाठी रुग्णालय आणि हेल्थ सेंटरच्या इमारती उभारल्या आहेत परंतु ते कार्यशील बनवण्यासाठी आवश्यक तितके मनुष्यबळ सरकारकडे नाही. जर ग्रामीण भागात कोरोना पसरला तर आपण या महामारीपासून एकाही रुग्णाचा जीव वाचवू शकणार नाही. कारण विषाणूशी लढण्यासाठी देशात डॉक्टरांची कमतरता आहे.

दर देशात कोरोना व्हायरस पसरला तर देशात डॉक्टरांची कमतरता आहे. डॉक्टरांच्या कमी संख्येवर 19 जुलै 2019 ला लोकसभेत आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे म्हणाल्या की PHC वर स्वीकृत एकूण 158,417 पदांमधील 34,417 पदे सॅक्शन करण्यात आली आहेत. यातील 27,567 पदांवर डॉक्टर काम करत आहेत म्हणजे 8572 पद अद्याप रिक्त आहेत.

एवढेच नाही तर सार्वजनिक आरोग्य केंद्रावर देखील जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर्सची कमी आहे. येथे एकूण 17,321 स्वीकृत पदे आहेत तर काम करणाऱ्यांची संख्या 17,019 आहे. म्हणजेच 2510 वैदकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे.

देशातील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची एकूण स्वीकृत पद 28,566 आहे परंतु 24,899 डॉक्टर आहेत. म्हणजेच 3667 डॉक्टर कमी आहेत. सब डिविजनल रुग्णालयात 19,576 डॉक्टर असायला हवेत मात्र फक्त 12,432 डॉक्टर आहेत म्हणजे 7,144 डॉक्टरांची कमतरता आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी विशेषज्ञ डॉक्टर हवेत. जे या आजारावर उपचार करु शकतील. परंतु देशात एकूण 82 टक्के विशेषज्ञ डॉक्टरांची कमी आहे. देशात एकूण 22,496 तज्ज्ञ डॉक्टर असायला हवेत. यात 13,635 पद स्वीकृत आहेत परंतु काम करणारे फक्त 4074 तज्ज्ञ डॉक्टर आहेत. म्हणजे 10051 पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या 18,422 ने कमी आहे. म्हणजे देशात 81.89 डॉक्टर कमी आहेत.