भाजपा-शिवसेना ला मतदान करू नका, यासाठी ‘आम्ही’ ५ कोटी पत्रके वाटणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आचारसहिंता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणासह २१ मागण्या मान्य करा अन्यथा येत्या निवडणुकांध्ये मतदानावर बहिष्कार टाकू अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित राज्यव्यापी बैठकी नंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. या भाजपा आणि सेनेला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. भाजपा शिवसेना ला मतदान करू नका यासाठी मराठा समाज ५ कोटी पत्रके वाटणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान, मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, यावेळी उद्धव ठाकरेंवरही मराठा समाजाने टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा समाजाशी उद्धटपणे वागणाऱ्या उद्धव ठाकरेंना आम्ही मराठा समाज मोठा की शिवसेना मोठी हे दाखवून देऊ. खेड्यापाड्यांमध्ये मराठ्यांच्या जीवावर सेना उभी राहिली आहे हे त्यांनी विसरू नये.

पुलवामा वरून दिग्विजय सिंग यांच्यानंतर ‘या’ भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद

शिवसेनेने ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले

‘आम्हाला गृहीत धरणे युतीला महागात पडेल’

इतकेच नव्हे तर, मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. मराठा बांधवांचा कणा मोडण्यासाठी १३ हजार ७०० गुन्हे दाखल झाले आहेत. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी जाळपोळ केलेली नाही. आमच्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत. आचारसहिंता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणासह २१ मागण्या मान्य करा अन्यथा येत्या निवडणुकांध्ये मतदानावर बहिष्कार टाकू. अशी घोषणाही त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाने केली.

याचबरोबर, भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. या भाजपा आणि सेनेला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर, भाजपा शिवसेना ला मतदान करू नका यासाठी मराठा समाज ५ कोटी पत्रके वाटणार आहे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर मराठा समाजाच्या विरोधात जो जो उभा राहील अशा सर्व पक्षांना पडण्याचे काम येत्या काळात मराठा समाज करणार असल्याचेही त्यानी म्हंटले.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

प्रसंगी पुढाऱ्यांना गावबंदी करावी

अपक्ष मराठा उमेदवारास साथ द्या

फितुरांपासून लांब राहा