सावधान ! हे App डाऊनलोड केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं, बँकेनं दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोनच्या काळात प्रत्येक कामे ऑनलाइन पद्धतीने होत असल्यामुळे दिवसेंदिवस फोन आणि इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. मात्र याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यानुसार नुकतेच पंजाब नॅशनल बँकेने आपल्या खातेधारकांना सतर्कता म्हणून एक अ‍ॅप मोबाईलमध्ये न ठेवण्याचा इशारा दिला आहे. या अ‍ॅपमुळे तुमचे बँक खाते केव्हाही रिकामे होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पीएनबीने ग्राहकांच्या जागृकतेसाठी पीएनबी का फंडा या नावाने अभियान सुरु केले आहे. या अभियानंतर्गत बॅकेकडून ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले जात आहेत. त्याअंतर्गत बँकेने आपल्या ग्राहकांना काही अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल न करण्याचा सल्ला दिला आहे.

या अ‍ॅपला तुमच्या फोनमध्ये देऊ नका थारा
पीएबीने याबाबत एक यादीच काढली आहे ती पुढीलप्रमाणे,त्यामध्ये Quicksupport, Anydesk, VNC या अ‍ॅपचा समावेश आहे. याशिवाय UltraVNC, TeamViver, Ammyy, Seescreen, BeAnywhere, LogMein, RealVNC, Skyfexetc ही अ‍ॅपसुद्धा धोकादायक असल्याचे पीएनबीने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे ईमेल,व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर मार्गानी मिळणाऱ्या लिंक बाबत सतर्क राहण्याचा इशारा देखील पीएनबीद्वारे ग्राहकांना देण्यात आला आहे. कारण अशा प्रकारच्या लिंकद्वारे थर्ड पार्टीकडून फोनमध्ये छेडछाड केली जाऊ शकते असे सांगण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीच्या कोणत्याही माध्यमातून ग्राहकांनी आपला पिन किंवा ओटीपी कोणासोबत देखील शेअर करू नहे असे ग्राहकांना सांगण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –