अल्पवयीन मुलीच्या सहमतीनं देखील सेक्स केल्यास तो गुन्हाच, न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलाबरोबर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीतील एका कनिष्ठ न्यायालयानं दिला आहे. एका केस संदर्भात त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोन तरूणांनी १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर दुष्कृत्य केले. या प्रकराणी न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत हा निर्णय दिला आहे.

आरोपी परवेश राणा वय ३० वर्षे आणि आशीष सेहरावत वय ४१ वर्षे अशी आरोपींची नाव असून दोघांनी या मुलीबरोबर दुष्कृत्य केले होते. पीडित मुलीने आपल्यासोबत यांनी दुष्कृत्य केल्याचे सांगितले होते. तर दोन्ही आरोपींनी बचावासाठी हे संबंध सहमतीने ठेवले होते असं सांगितलं होते. मात्र न्यायालयाने दोघांनीही दोषी ठरवले आहे. कलम ३७५ अतंर्गत १६ वर्षांहून कमी वयाच्या अल्पवयीन मुलीबरोबर सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच ठरतो, असं न्यायालयाने सांगितले आहे.

परवेश राणा आणि आशिष दोघांनी यापूर्वी तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या पूर्वीच्या शिक्षेऐवढी म्हणजे ६ वर्ष परवेशला आणि ५ वर्ष आशिष याला देण्यात आली आहे. तसंच राणाला ४० हजार आणि आशीषला ६० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान, २००९ मध्ये या आरोपींनी हे दुष्कुत्य केले होते. तसंच या गुन्ह्यातील दोन आरोपींना आरोपमुक्त करण्यात आले आहे. पीडितेने सांगितल्यानुसार गुलशन आणि अमित यांनी कोणतेही दुष्कृत्य केले नाही, त्यामुळे त्यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –