मुलीला अश्लिल मेसेज पाठवणारा IIT चा विद्यार्थी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीला सोशल मीडियावर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या IIT च्या विद्यार्थ्याला पोलिसांनी गजाआड केले. अटक करण्यात आलेला विद्यर्थी आयआयटीमधील संशोधक विद्यार्थी आहे. त्याने आयआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला सोशल मीडियावर अश्लिल मेसेज पाठवून तिला मानसीक त्रास दिल्याची तक्रार पीडित मुलीने पवई पोलीस ठाण्यात दिली आहे.

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विद्यार्थ्याला सातारा जिल्ह्यातील त्याच्या गावातून अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने अशाच प्रकारे अनेक मुलींना त्रास दिल्याचे समोर आले आहे.विजय देशमुख (वय-३५) असे अटक करण्यात आलेल्य विद्यार्थ्याचे नाव आहे. विजय देशमुख मुळचा सातारा येथील असून त्याने अनेक विद्यार्थीनींना अश्लिल मेसेज पाठवून मानसिक त्रास दिला आहे.

पीडित मुलगी राजस्थानची असून ती मागील तीन वर्षापासून मुंबई आआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. विजय देशमुख याने नोव्हेंबर २०१६ मध्ये पीडित मुलीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. मात्र तो ओळखीचा नसल्याने तिने त्याची रिक्वेस्ट स्विकारली नाही.

काही दिवसांनी प्रत्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना पिएचडी करणारे संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यपक मार्गदर्शन करणार होते. तयार करण्यात आलेल्या गटामध्ये विजय देशमुख हा होता. त्यावेळी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा हाच असल्याचे पीडित मुलीच्या लक्षात आले होते. असे तिने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले. त्यानंतर २०१७ मध्ये विजयने प्रेम कविता पाठवली असल्याचेही पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.

काही दिवासांनी विजयने पीडित मुलीला ई-मेल पाठवून अश्लिल मेसेज पाठवले. याची तक्रार संस्थेकडे केल्यानंतर विजयला संस्थेतून काढून टाकण्यात आले होते. असे महिला तक्रार निवारण केंद्रातील अधिकाऱ्याने पीडित मुलीला दिली होती. दरम्यान, पीडित मुलगी प्रोजेक्टसाठी कोरीयामध्य गेली होती. ती भारतात परत आल्यानंतर आरोपी मेलद्वारे अश्लिल मेसेज पाठवत होता. अखेर मुलीने पोलिसांत धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी विजय देशमुखविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

सिने जगत –

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

You might also like