बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्याला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चाकण पोलिसांनी भाम्बोली (ता. खेड) येथून बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.

राम बबन लालगुडे (३०, रा. टाकवे , ता. मावळ जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी जवळच्या भागात एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी गुरुवारी सापळा रचून राम याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.