तुरूंगात शिक्षा भोगत होता भाऊ, दीरानं वहिशी ठेवले संबंध अन् नंतर…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्ये एका तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. प्रकरणात पोलिसांनी दम भरताच आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. महत्त्वाच म्हणजे अनैतिक संबंधातून ही हत्या (illicit-relationship-with-younger-brother-wife-murdered) तपासातून समोर आले आहे.
उत्तर प्रदेशातील चंदौली पोलीस ठाणे हद्दीत धुरी कोट हे गाव आहे. दोन महिन्यांपूर्वी गावातील राकेश रोशन नावाच्या तरुणांचा मृतदेह आढळला होता. या तरुणाची गोळ्या घालून हत्या झाली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, हाती काहीच लागत नव्हते. याच दरम्यान 29 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी एका चकमकीत आशुतोष यादव नावाच्या आरोपीला अटक केली होती.

आशुतोषने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची पोलीस चौकशीत माहिती दिली. राकेश रोशनच्या हत्येमध्ये सहभागी असल्याची कबूलीही त्याने दिली. राकेशची हत्या त्याचा लहान भाऊ मुकेश यादवने केल्याची माहिती आरोपीने दिली. आशुतोषने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मुकेशला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली देत कारणाचाही खुलासा केला. पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या रागातून मोठ्या भावाची हत्या केल्याचे मुकेशने पोलिसांना सांगितले.

एका हत्या प्रकरणात मुकेश तीन वर्ष तुरुंगात होता. याच काळात मुकेशची पत्नी आणि राकेश रोशन या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काही महिन्यांपूर्वी मुकेश जामीनावर तुरूंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती कळाली. त्याच्या मोठ्या भावानेच पत्नीशी संबंध ठेवल्याचा मुकेशला राग आला. याच काळात मुकेशचा तुरूंगात मित्र झालेला आशुतोष जामीनावर बाहेर आला होता. मुकेशने सगळा प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर आशुतोषला सोबत घेऊन मुकेशने मोठ्या भावाच्या हत्येचा कट रचला.

मुकेश, आशुतोष यादव आणि आणखी एकासोबत मोठा भाऊ राकेशला दारू पिण्यासाठी सीवानला घेऊन गेला. त्याच वेळी मुकेशने राकेशची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांना कोणतीही माहिती हाती लागत नव्हती. मात्र, 50 हजाराचा बक्षीस असलेल्या आरोपी आशुतोष याला अटक केल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.